Marathitarka.com

या राशीचे पुरुष असतात अत्यंत खोटरडे ! घ्या जाणून…

या राशीचे पुरुष असतात अत्यंत खोटरडे ! घ्या जाणून…

मुलं सतत काही ना काही चुका करतच राहतात आणि ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण चूक झाल्यावर त्यांना आई बाबांकडून ओरडा खावाच लागतो. वेळेप्रसंगी मारही पडतो. तुम्हीही तुमच्या लहानपणी कोणत्यातरी चुकीसाठी आई-वडिलांची खरडपट्टी नक्कीच ऐकली असेल.

एवढेच नाही तर कधी कधी शिक्षाही भोगली असेल. बस्स हेच सर्व टाळण्यासाठी आणि आपली चूक लपवण्यासाठी मुलं अनेकदा खोटं बोलू लागतात. एखादी चूक करूनही ते ती चूक काही केल्या मान्य करत नाहीत किंवा अशा परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खोटं बोलणं सुरू करतात.

गंमत म्हणून आज आपण पाहणार आहोत की राशीनुसार कोणती मुलं कशी असतात? तुमच्या मुलाच्या राशीवरून तुम्ही त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधू शकता.

सिंह रास : सिंह राशीची मुले आपल्या पालकांचे लक्ष वेधण्यासाठी खोटे बोलू शकतात. ते इतके हट्टी असतात की ते आपल्या खोट्यासमोर कोणाचे काहीही ऐकत नाहीत आणि खोटेही अशा प्रकारे बोलतात की तुम्हाला ते सत्यच वाटू लागते.

तुम्ही या राशीच्या मुलांना खोटे बोलताना पकडू शकता, कारण जेव्हा ही लोक खोटे बोलतात तेव्हा ते नजर चोरतात आणि समोरच्याच्या नजरेस नजर भिडवण्यास घाबरतात.

तूळ रास : तूळ राशीच्या मुलांना खोटे बोलणे अजिबात आवडत नाही, पण त्यांना कोणत्याही संकटापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर ते अशा परिस्थितीत खोट्याचा आधार घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

ते चूक मान्य करणे टाळतात, कारण यामुळे त्यांना कमीपणा आणि अस्वस्थ भावना वाटू लागते. समस्येपासून बचाव करण्यासाठी ते वाक्यात सहज काहीही छोटे-मोठे बदल करत राहतात.

मिथुन रास : जर तुमचे मुल मिथुन राशीचे असेल तर तुम्ही जास्त काळजी घ्यावी. ही मुलं एवढी मस्ती करतात की घरात गोंधळ उडतो आणि या काळात चुकूनही त्यांच्या हातून काही फुटलं तर तो दोष ते सहजपणे दुसऱ्यावर टाकतात. कदाचित ही मुलं ती तुटलेली गोष्ट लपवूनच ठेवतील आणि तुम्हाला त्याबद्दल थांगपत्ताही लागू देणार नाहीत.

Team Marathi Tarka