या मुलांवर अक्षरश: फिदा असतात मुली ! घ्या जाणून…

या मुलांवर अक्षरश: फिदा असतात मुली ! घ्या जाणून…

एब्स आणि मर्दानी शरीर पाहून मुली आपल्या प्रेमात पडतात असं बहुतांश मुलांना वाटतं! पण हे अजिबात खरं नाही. कोणतीही मुलगी मुलांचे मसल्स आणि ऍब्स पाहून प्रभावित होऊ शकते आणि तुमची स्तुती करू शकते, wow अशी प्रतिक्रिया देऊ शकते.

पण जेव्हा संबंध नातं पुढे नेण्याचा असतो तेव्हा मात्र मुली तुम्हाला न सांगता तुमच्याबद्दल काही गोष्टी नोटिस करू लागतात. अनेक मुलं आपल्या क्रश किंवा आवडत्या मुलीला खाली दिलेल्या गोष्टींवर भर न दिल्याने गमावतात.

स्वभाव व मन स्वच्छ असणं गरजेचं तर आहेच पण सोबतच या काही लहान-सहान गोष्टींचंही पालन करावं, खास करून जेव्हा एखाद्या मुलीला इंप्रेस करायचं असेल. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्यामुळे तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती आयुष्यभरासाठी भेटू शकते.

हे खरे आहे की मुली त्यांच्या त्वचेची काळजी घेण्याबाबत अधिक सतर्क असतात. त्यांना त्यांच्या जोडीदारातही तोच गुण पाहायचा असतो. यामुळेच मुलींना तीच मुलं पटकन आवडतात जे आपली त्वचा मॉइश्चराइज, क्लीन आणि हेल्दी ठेवण्यावर लक्ष केंद्रित करतात. मुलांची ही गुणवत्ता मुलींना त्यांच्याशी भावनिकरित्या जोडण्यास मदत करते.

ब्युटीशियन आणि मेकअप आर्टिस्ट दुष्यंत कुमार याविषयी सांगतात की, ‘मुलांनी केवळ मुलींना प्रभावित करण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या वर्क प्लेसच्या ठिकाणी चांगलं इंप्रेशन बनवण्यासाठी आणि करिअर ग्रोथसाठी सुद्धा मुलांनी स्वत:च्या ग्रूमिंगकडे लक्ष दिले पाहिजे.

यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात बॉडी लोशन, हँड मॉइश्चरायझर आणि डीओ किंवा हलका परफ्यूम यासारख्या आवश्यक गोष्टींचा समावेश करावा.मुलांमध्ये मुली सर्वात आधी नोटिस करतात ती गोष्ट म्हणजे त्यांचा ड्रेसिंग सेन्स. याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही महागडे आणि ब्रँडेड कपडेच घालावेत.

तर त्यापेक्षा तुम्ही जे काही परिधान कराल ते पद्धतशीर व चांगल्या रितीने कॅरी करा. म्हणजेच कपडे स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले, फॉर्मल असतील तर व्यवस्थित इन वगैरे केलेले असावेत. केवळ तुमचे कपडेच नाही तर तुमच्या फुट वेयरवरही मुलींची बारीक नजर असते. ते जितके स्वच्छ आणि चमकदार असतील तितकी तुमची छाप अधिक खोलवर पडते.

तुम्ही तुमचे केस कसे सांभाळता याकडे मुली खूप लक्ष देतात. तुम्हाला ट्रेंडी हेअरस्टाइलच कॅरी करण्याची काहीच गरज नाही. पण तुमचे केस व्यवस्थित ठेवल्यास मुली खूप आकर्षित होतात. मुली मुलांमध्ये कोरड्या आणि बाउंस केसांऐवजी जेल किंवा तेल लावलेले केस जास्त पसंत करतात.

याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही चिपकु हेअरस्टाइल करावीत! फक्त तुमच्या केसांना वेट म्हणजेच ओलसर लुक द्या.त्यामुळे तुम्ही दिवसभर ताजे एनर्जेटिक आणि उत्साही दिसाल.

Team Marathi Tarka