विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर घुसला तिच्या घरात,नवऱ्याने पकडले अन नंतर झाले असे…

लखनौ – उत्तर प्रदेशमधील ललितपूरमध्ये विवाहित प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला सदर महिलेच्या पतीने चांगलीच अद्दल घडवली. या महिलेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर घरी आल्याचे कुणीतरी तिच्या पतीला सांगितले.
त्यानंतर पतीने अचानक घरात धडक देत मित्रांच्या मदतीने त्याला पकडले आणि त्याची धुलाई केली. एवढेच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओही तयार केला आणि तो व्हायरल केला. दरम्यान, चोप दिल्यानंतर या महिलेच्या प्रियकराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
वर्णी जैन इंटर कॉलेजच्या मागे राहणाऱ्या महिलेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर तिच्या घरी आला होता. याच दरम्यान कुणीतरी तिच्या पतीला याची माहिती दिली. तेव्हा तिचा पतीही मित्र मंडळींना जमवून तिथे पोहोचला. त्याने त्याच्या पत्नीच्या प्रियकराची धुलाई केली.
यादरम्यान ही महिला तिच्या प्रियकराला वाचवताना दिसत होती. तिने सांगितले की, सकाळी पतीने आणि या तरुणाने एकत्र चहा पिली होती. तसेच रात्री एकत्र बसून मद्यपान केले होते. मात्र दुपारी हा तरुण एकटा घरात काय करत होता, यावरून सदर पतीचा राग अनावर झाला होता.
त्याने आणि त्याच्या मित्रांनी त्याला मा:’-र’:- हा’:-ण केली. तसेच या मा’:-र’:-हा’:- णी’:- चा व्हिडीओही बनवला.ज्या तरुणाला पकडून मारहाण करण्यात आली. तो गुपचूप मार खात होता. त्याने अजिबात विरोध केला नाही. तसेच मारहाणीनंतर या प्रियकराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आता या मा’:-र’:-हा’:-णी’:-चा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.