Marathitarka.com

स्वतःच्याच लग्नात तरुणीने केले असे कांड,लोक म्हणाले लग्नानंतर कस होणार…

स्वतःच्याच लग्नात तरुणीने केले असे कांड,लोक म्हणाले लग्नानंतर कस होणार…

झोप हा विषय अनेकांच्या आवडतीचा विषय असतो. एखाद्या व्यक्तीला झोप झाली नाही तर त्याचे डोके दुखते. त्याला ऍसिडिटी होते. मग त्याला दिवसभर करमतच नाही, असे अनेक लोक आपल्याकडे आहेत की, दुपारची झोप ते टाळतच नाहीत. त्यांना झोप ही अतिशय प्राणप्रिय असते. मात्र, एखाद्या कार्यामध्ये एखादा व्यक्ती झोपला तर त्याच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणात होते.

अनेकदा राजकीय मंडळींचे अनेक कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांमध्ये राजकीय मंडळी झोपी जातात. मग त्यांच्यावर अनेकजण टीका देखील करतात. मात्र, आता स्वतःचे लग्न असतानाच एखादी तरुणी लग्नात झोपल्यावर त्याला काय म्हणावे. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत काही माहिती मिळाली नाही.

मात्र, या व्हिडिओची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. या व्हिडिओनुसार नवविवाहित जोडप्याचे लग्न झाल्याचे दिसत आहे. गुरुजी मंत्र म्हणताना दिसत आहेत. शेजारी नवरा पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बसला आहे, तर नवरी लाल रंगाच्या साडीत बसलेली आहे. गुरुजी मंत्र म्हणत असताना या तरुणीला अचानक झोप लागली. मग ती मंडपातच झोपी गेली. मंत्र एकीकडे सुरू आहेत.

हा प्रकार मग नवरदेवाच्या लक्षात आला आणि त्यानंतर त्याने नवरीला लगेच हलवून जागे केले. त्यानंतर नवरीला देखील आपली चूक लक्षात आली. आपण लग्नातच झोपलो, असे तिला वाटले. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, तर काहीजणांनी यावर म्हटले आहे की, नवरी बिचारी खूप थकून गेली असेल. त्यामुळे तिला असा त्रास होत असेल, तर आपल्याच लग्नात असे का झोपावे असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

Team Marathi Tarka