सासू पडली जावयाच्या प्रेमात,नंतर झाले असे ऐकून बसेल धक्का…

सासू पडली जावयाच्या प्रेमात,नंतर झाले असे ऐकून बसेल धक्का…

प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली आणि लग्नाआधीच मुलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

सासूने जावयावर प्रेम जडल्याने मुलीच्या लग्नाचं आमंत्रण चक्क नाकारलं आहे. जावयावर प्रेम असल्याची कबुली तरुणीच्या आईने दिली. यामुळे तरुणीला खूप मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियातील एका तरुणीने आपलं हे दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

आपल्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी तरुणी तिच्या आईच्या घरी गेली होती. त्यावेळी आपण लग्नाला येऊ शकत नाही, असं तिच्या आईने सांगत तिला स्पष्ट नकार दिला. हे उत्तर ऐकून तरुणीला मोठा धक्का बसला. मात्र आपली आई आपल्या लग्नाला यायला का नकार देत आहे याचं नेमकं कारण समजलं नाही.

म्हणून तिने पुन्हा पुन्हा याबाबत आईकडे विचारणा केली. त्यावेळी अखेर आईने आपल्या मनातील भावना मुलीला सांगितल्या. आपल्या होणाऱ्या जावयावर प्रेम जडलं असून त्यामुळेच आपण या लग्नाला हजर राहायला नकार देत आहोत असं तिने सांगितलं.

लग्नाआधीच मुलीच्या पायाखालची जमीन सरकली : आईने धक्कादायक माहिती दिल्यावर मुलीला गेल्या काही महिन्यांतील घटना आठवू लागल्या. आपण होणाऱ्या पतीसोबत बाहेर जाताना अनेकदा आपली आई सोबत असायची. दोघे एकमेकांसोबत अनेकदा टेनिसही खेळत असत.

मात्र त्यातून असं काही होईल, याची कधी कल्पनाही आली नसल्याचं मुलीने म्हटलं आहे. तरुणी सध्या या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तर सोशल मीडियावर अनेकांनी तरुणीची बाजू घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Team Marathi Manoranjan

Related articles