Marathitarka.com

संबंधांचा शेवट वाईट होतो तरीही लोक यातून शिकत का नाहीत?

संबंधांचा शेवट वाईट होतो तरीही लोक यातून शिकत का नाहीत?

कोणी सांगितले? काही पुरावा किंवा स्टडी उपलब्ध आहे का? हे वाईट ते वाईट ठरवणारी लोक कुठले माप दंड वापरतात?आपल्या इकडे संस्कृती आणि समाज ह्यांचा दबाव इतका असतो कि शेवट वाईट होतो नाहीतर ह्यामधून देखील शांत पणे गु-न्-हा न करता मार्ग काढता येतो.

ह्यामध्ये जास्त बळी पुरुषांचे जातात तरीही पुरुष समजून घेत नाही.जो पकडला गेला तो चोर त्यामुळे ज्यांचे संबंध पकडले गेले ते आरोपी बाकी न पकडले गेलेले आरोपी नाही.आणि महत्वाचे म्हणजे सर्व संबंध हे समाजापासून झाकून ठेवले जातात, भले गुन्हे घडले तरी उघड करत नाही.

जन्माला येणारा कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही तर त्याच्यासाठी सर्वकाही नवीन असते तो नव नवीन अनुभव घेत जातो त्यामुळे त्यांच्यासाठी पहिली वेळ असते व आयुष्य शिकवणार असते. हे चक्र असेच सुरु राहील. म्हातारे जातील, तरुण येतील, चुका करतील शिकतील, म्हातारे बनतील जातील परत तरुण येतील आणि चक्र सुरु राहील.

Team Marathi Tarka