रात्रीच्या अंधारात रंगीन चाळे करणाऱ्या प्रियकर प्रेयसीला पकडले गावकऱ्यांनी, अन मग नंतर…

अनेकदा प्रियकर आणि प्रियकर यांना भेटण्यासाठी आडोसा किंवा एक वेगळी जागा शोधावी लागते.राजरोसपणे त्यांना भेटता येत नाही.मात्र, आता शहरामध्ये असे प्रकार सर्रासपणे पाहायला मिळत आहेत.आता कोणी कोणाला घाबरत देखील नसल्याचे समोर आले आहे.मात्र बिहारच्या एका गावात एक असाच प्रकार उघडकीस आला आहे, तर गावकऱ्यांनी दोघांसोबत अतिशय वेगळी कृत्य केले आहे.
बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. ही घटना ऐकल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एक तरुण आणि तरुणी लपून-छपून रात्रीच्या अंधारामध्ये भेटत होते आणि नको ते चाळे करत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना पकडून त्यांचे थेट लग्न लावून देण्याचा प्रकार केला आहे. त्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा तरुण तरुणीला भेटण्यासाठी अनेकदा गावात यायचा.
मात्र, तो काही लोकांच्या हाती लागत नव्हता. याबाबत अनेकांना माहिती देखील होती. त्यामुळे आपल्या गावाची बदनामी होईल, असे देखील अनेकांना वाटत होते. त्यामुळेच गावकऱ्यांनी एक दिवस एक प्लॅन तयार केला आणि त्यानंतर लोकांनी रात्रीच्या अंधारात भेटण्यास आलेल्या प्रियकराला पकडले आणि त्यानंतर त्या तरुणांना देखील आणले आणि दोघांना मग तुम्ही दोघं एकमेकांचे एकमेकांवर प्रेम करता का? असे गावकऱ्यांनी विचारले.
त्यानंतर दोघांनी होकार दिल्यानंतर मग त्यांचे गावकऱ्यांनी लग्न लावून दिले. आता त्यानंतर या दोघांना लपून छापून भेटण्याची गरज उरली नाही. आता रीतसर पद्धतीने या दोघांचा विवाह लावल्यामुळे ही दोघेही आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी ही घटना तुरळक म्हणावी लागेल. एकूणच या प्रकाराचे सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे देखील दिसत आहे.