प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी प्रेयसीने केले असे,जाणून व्हाल थक्क…

प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी प्रेयसीने केले असे,जाणून व्हाल थक्क…

प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जातात. यूकेमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी तिची 10 हजार पौंड म्हणजेच सुमारे 10 लाख रुपयांची नोकरी सोडली आहे.

विशेष म्हणजे, 10 लाख रुपयांची नोकरी सोडल्यानंतरही तिच्या प्रियकराच्या आईने तिला स्वीकारले नाही.एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा उल्लेख बेली हंटर नावाच्या एका महिलेने टिकटॉकवर केला आहे.

टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करताना महिलेने म्हटले की, हूटरमध्ये काम करते, हे तिच्या प्रियकराच्या आईला मान्य केले नाही. जरी मी प्रामाणिकपणे आणि कष्टाने आयुष्य जगत होते, परंतु माझ्या प्रियकराच्या आईला हे समजले नाही, असे बेली हंटर हिने म्हटले आहे.

प्रियकराला नोकरीबद्दल अडचण नव्हतीप्रियकराला माझ्या नोकरीबद्दल कोणतीही अडचण नाही. जेव्हा पहिल्यांदा प्रियकराच्या पालकांना भेटली, तेव्हा ते माझ्याशी चांगले वागले. पण जेव्हा त्यांना माझ्या नोकरीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा माझ्या प्रियकराच्या आईचा मूड बदलला.

मी 10 लाख रुपये कमवत होती, तरीही प्रियकराच्या आईला नोकरी आवडत नव्हती, असे बेली हंटरने म्हटले आहे.प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी सोडली नोकरीयानंतर बेलीने प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी नोकरी सोडली.

ती नोकरी सोडल्यानंतर सोशल मीडियावर काम सुरु केले. यानंतरही प्रियकराच्या आईने त्याला सांगितले की, तिला बेली आवडत नाही आणि तिला स्वीकारू शकत नाही. बेलीच्या प्रियकराने सुरुवातीला आईला विरोध केला. पण तो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो आणि सध्या त्याचा सर्व खर्च त्याची आई करत आहे.

त्यामुळेच त्याचे आयुष्य आता त्याच्या आईच्या ताब्यात आहे.व्हिडिओवर विविध प्रतिक्रियादरम्यान, बेली हंटरसाठी हा सर्वात मोठा धडा होता की, ती दुसऱ्याच्या आनंदासाठी तिची नोकरी सोडू शकत नाही.

हा व्हिडिओ 220k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, तुम्ही त्या नात्यात कधीच आनंदी राहू शकल्या नसत्या. ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाहीत.

Team Marathi Tarka

Related articles