प्रियकराने दिली प्रेयसीला अशी भयंकर शिक्षा ! ऐकून उडेल थरकाप…

प्रियकराने दिली प्रेयसीला अशी भयंकर शिक्षा ! ऐकून उडेल थरकाप…

काहीवेळा एका छोट्याश्या चुकीमुळे आयुष्यभराचा त्रास सहन करावा लागू शकतो. याचीच प्रचिती ब्राझीलमधील एका महिलेला आली आहे. वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लूनं प्रियकराने तिचे डोळेच चिकटवले. ही महिला आता प्रचंड वेदना सहन करत आहे.

अनेक प्रकारच्या ट्रिटमेंट घेऊनही आता तिचे डोळे पूर्वीसारखे होऊ शकतील का, हे सांगणं कठीण आहे. ही घटना ब्राझीलच्या कॅचियोइरो डी इतापेमिरिम शहरातील आहे.55 वर्षीय रेजिना अर्नाम ही ग्लूकोमा या गंभीर आजारानं त्रस्त आहे.

यामुळे तिला दररोज आय ड्रॉपचा वापर करावा लागतो. ती हे आय ड्रॉप आपल्या घरातील फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवते. द सननं दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या प्रियकराने ग्लूदेखील त्याच फ्रिजमध्ये ठेवला, जिथे रेजिनानं आय ड्रॉप ठेवले होते. रेजिनाच्या डोळ्यांमध्ये त्रास होऊ लागल्यानं तिनं आपल्या प्रियकराची मदत मागितली.

मात्र, त्याला फ्रिजमध्ये असलेल्या गोंदच्या आणि आय ड्रॉपच्या बाटलीतील फरक लक्षात आला नाही आणि त्यानं रेजिनाच्या डोळ्यात आय ड्रॉपच्या जागी ग्लू टाकला.डोळ्यात विषारी केमिकल्स असलेला ग्लू जाताच रेजिनाला प्रचंड वेदना होऊ लागल्या.

तिची डोळे पूर्णपणे चिकटल्यानंतर प्रियकराला आपली चूक लक्षात आली. ग्लू आणि आय ड्रॉपच्या बाटल्याही सारख्या होत्या आणि त्यांची नावंही थोडीफार सारखी होती. घटनेच्या वेळी तरुणानं आपला चष्मा लावलेला नव्हता.

रेजिनानं सांगितलं, की ग्लूचा थेंब माझ्या डोळ्यात पडताच तीव्र वेदना होऊ लागल्या. असं वाटलं की आता माझा डोळा फुटणार आहे. लगेचच तिला रुग्णालयात नेण्यात आलं. रेजिनानं सांगितलं, की रात्रभर तिच्या डोळ्यात पाणी येत राहिलं.

नेत्रतज्ज्ञ लिआना टिटो म्हणाले, ‘जेव्हा सुपरग्लू, किंवा अल्कोहोल युक्त जेलसारखी रासायनिक उत्पादने डोळ्यावर लावली जातात तेव्हा तीव्र जळजळ होते आणि त्याचा डोळ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

डोळ्याच्या आत ग्लू चिकटल्याने कवच तयार होऊन मोठी जखम होऊ शकते. ग्लू काढून टाकल्यानंतर रेजिनाचा डोळा आता उघडला गेला असला तरी तिच्या डोळ्यांचे किती नुकसान झाले आहे आणि ते किती काळ राहील हे स्पष्ट नाही.

Team Marathi Tarka

Related articles