प्रेमात फसवणूक झालेल्या महिलांच्या त्या गोष्टी प्रत्येक पुरुषांना माहीत असणे आवश्यक ! घ्या जाणून…

प्रेमात फसवणूक झालेल्या महिलांच्या त्या गोष्टी प्रत्येक पुरुषांना माहीत असणे आवश्यक ! घ्या जाणून…

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता आणि त्यानं तुमचं मन दुखावल्यास आपला प्रेमावरील विश्वास पूर्णपणे उडतो, यात शंका नाही. नात्यांवरील विश्वास गमावल्याने आपण पूर्णतः कोलमडता, पण अशा वेळेस तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आली तर त्याने तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी तुमची अपेक्षा असते.

अशा परिस्थितीत पुरुषांनीही आपल्या जोडीदाराची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर त्यांच्या कठीण प्रसंगी त्यांचा आधार होणे तुमचे कर्तव्य बनते.बर्‍याचदा बहुतांश महिला ब्रेकअप किंवा फसवणुकीनंतर दुसरे नाते स्वीकारतात, त्यावेळेस भूतकाळातील अनुभवावरून त्या आपल्या जोडीदारावर संशय घेऊ लागतात.

अशा परिस्थितीत दुरावण्यापासून त्यांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही प्रेमात असाल किंवा नात्यातल्या कोणत्यातरी मोठ्या फसवणुकीचा बळी ठरलेल्या महिलेचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असाल तर याकरीता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतील.

विश्वास बसल्यासच देतात संधी : जेव्हा एखाद्या महिलेला प्रेमात फसवणूक किंवा विश्वासघाताचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीवर विश्वास बसल्यानंतरच ती तुमच्यासोबतच्या नात्यास संधी देते. एखाद्या महिलेसाठी तुमच्यावर विश्वास ठेवणे ही छोटी गोष्ट नाहीय, हे समजून घ्या.

कारण अशा वेळेस तिला मनातील सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करताना भीती वाटत नाही. याचा अर्थ ती तुमच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचार करत आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

मनातील वेदना व्यक्त करते : जेव्हा एखाद्या महिलेचं मन खूप वेळा दुखावले जाते, तेव्हा ती तुमच्यासोबत नाते पुढे नेण्यास घाबरते, असे मुळीच नसते. पण तिला तिच्या मनातील गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात. प्रेमात फसवणूक झालेल्या महिलेला तिच्या भूतकाळाबद्दल तुमच्यासमोर रडायचे नसते.

तिला केवळ सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात. ती तुम्हाला तिच्या आयुष्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असते म्हणून ज्या गोष्टींची भीती वाटते त्याबद्दल तिला तुम्हाला सर्व काही सांगायचे आहे, जेणेकरून त्या पुन्हा घडू नयेत.

मन पुन्हा दुखावले जाऊ नये, याचा प्रयत्न : जेव्हा जवळचा व्यक्ती एखाद्या महिलेचं मन दुखावतो,तेव्ही ती वाईटरित्या कोलमडते. अशा परिस्थितीत आपण पुन्हा दुखावले जाणार नाहीत, याची काळजी ती घेत असते. ज्यामुळे कधीकधी ती तुम्हाला थोडी अंतर्मुख वाटू शकते.

परंतु या मागचे कारण तिचा भूतकाळातील अनुभव आहे. ब्रेकअप होण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कारणे असू शकतात, म्हणून त्यांच्यावर शंका घेण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

प्रेमाची असते आवश्यकता : दुःखातून बाहेर आलेल्या महिलेला तुम्ही अनेक गोष्टी समजावून सांगता आणि त्या तिलाही समजतात. पण कधी कधी तुम्ही असे काही शब्द देखील वापरता ज्यामुळे त्यांची खूप निराशा होते. अशा महिलेला केवळ एक जोडीदार हवा असतो.

जो तिच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकेल, तिची काळजी घेईल. आपण अशा व्यक्तीसोबत आहोत, ज्यासोबत आता घाबरण्याची आवश्यकता नाही, याची जाणीव त्यांना होणे आवश्यक आहे.

Team Marathi Tarka