प्रसूतीवेळी लेबर रुममध्ये नवऱ्यासोबत राहिला हजर दीर,नंतर झाले असे…

महिलेसाठी डिलिव्हरीचा क्षण हा अत्यंत खास असतो. मात्र यावेळी वेदनादेखील खूप होतात. मात्र पतीची साथ असेल तर या वेदना कमी जाणवू लागतात. एका महिलेने आपला असाच अनुभव रेडिटवर शेअर केला आहे. अर्थात यावेळी पत्नीने आपल्या पतीवर संताप व्यक्त केला. यामागे पतीच कारणीभूत होता.
पतीने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे महिला संतापली. पतीने सांगितलं की, डिलिव्हरीच्या वेळी लेबर रूममध्ये महिलेचा दिर म्हणजे तिच्या पतीचा भाऊ देखील हजर राहील. या गोष्टीवरुन महिलेने संताप व्यक्त केला.
लेबर रूममध्ये पत्नीने दिराच्या उपस्थितीमागील कारण विचारलं..
महिलेने रेडिटवर लिहिलं की, माझ्या गर्भात जुळी मुलं आहेत. 31 आठवड्याची प्रेग्नेंन्सी आहे. आम्ही एक वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करीत होतो. माझ्यासाठी प्रेग्नेन्सीचा काळ खूप कठीण आहे. माझा दीर मेडिकलचं शिक्षण घेत आहे. यामुळे माझ्या पतीने दिरालाही सोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.
माझा पती लहानपणीचा मित्र आहे. आम्ही एकत्रच मोठे झालो आहे.लेबर रूममध्ये दिराच्या उपस्थितीबद्दल महिलेने आक्षेप नोंदवला. पती म्हणाला की मला त्यावेळी एक अशी व्यक्ती हवी आहे जी मला मदत करू शकेल. रेडिटवर महिलेची पोस्ट वाचून लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका व्यक्तीने लिहिलं की, मुलाला जन्म देणं हे खूप कठीण काम आहे. अशात तुम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. तर दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की, तू पतीला घटस्फोट दे.अशावेळीदेखील तो नियम व अटी ठेवतो. महिलेने सांगितलं की, लेबर रूममध्ये तिला आपल्या पतीसमोरच लाज वाटेल, असावेळी जर तिथं दिर असला तर तिची अवस्था भयंकर होईल.