Marathitarka.com

पोलिसानेच केला बालविवाह,ठेवले संबंध अन गर्भवती राहिल्यावर दिल्या गोळ्या अन मग…

पोलिसानेच केला बालविवाह,ठेवले संबंध अन गर्भवती राहिल्यावर दिल्या गोळ्या अन मग…

बालविवाह करणे कायद्याने गु-न्-हा आहे. मात्र हा बालविवाह रोखण्याचं आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचं ज्यांच्याकडे काम आहे, त्याच पोलिसाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.एवढंच नाही तर अल्पवयीन विवाहिता गरोदर राहिल्यानंतर खाजगी रुग्णालयातील गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याचा देखील आरोप होत आहे.

हे सगळं झालेलं असताना, पोलिसाच्या या कृत्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करत पाठबळ देण्याचं काम बीडच्या गेवराई पोलिसांनी केलंय.बीड जिल्हा बालविवाह करण्याच्या बाबतीत, राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि हेच बालविवाह रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कायदे कडक केले जात आहेत.

मात्र याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका असणाऱ्या पोलिसांकडूनच कायद्याचं उल्लंघन केलं गेलंय.याविषयी 17 वर्षीय पीडितेने बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात तक्रारीवरून, पीडितेचा पती हा बीड पोलीस दलात आहे. 18 मे 2022 रोजी तिचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून दिला.त्यानंतर सासरच्या मंडळीने एक महिना चांगले नांदवले. त्यानंतर पती, सासरा, सासू, भावजय, जाऊ, दीर, नणंद यांनी प्लॉट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये घेवून ये म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली.

त्यावर आई-वडील गरीब असल्याचे सांगितल्यावर इथे रहायचे असेल तर पैसे आणावेच लागतील, असे म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली. हा त्रास वाढतच राहिल्याने ही बाब पीडितेने वडिलांना सांगितली व त्यानंतर वडील माहेरी घेवून गेले.त्यानंतर मुलीला नांदायला पाठवायचे असेल तर प्लॉटसाठी 15 लाख रुपये द्या, नाही तर मुलीला पाठवू नका, असा निरोप सासरच्या मंडळींनी दिला.

त्यानंतर माहेरी येवून पैसे द्यावेच लागतील असे म्हणून पतीने शिवीगाळ करत मा-र-हा-णही केली. या दिलेल्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात दि.2 जानेवारीला पतीसह सासरच्या 8 जणांवर गु-न्-हा दाखल करण्यात आलाय.विशेष म्हणजे ही फिर्याद देतानाच पिडीतेने आपलं वय 17 असल्याचं नमूद केलय. तसं पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देखील 17 वर्ष नमूद आहे. मग हे सर्व असताना संबंधित पोलिसांनी आणि ठाणे प्रमुखांनी बालविवाहाचा गु-न्हा का दाखल केला नाही ? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Team Marathi Tarka