जोडीदाराला ठेवायच आहे आयुष्यभर सुखी , तर मग कधीच करू नका या चूका ! संपू शकते वैवाहिक नाते…

कोणतेही नाते कधीच परिपूर्ण नसते. मग ते पती-पत्नीचे सुंदर नाते असो किंवा मग गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे निखळ नाते असो! नात्यात बरेचदा चढ-उतार हे येतच असतात. खास करून जेव्हा जोडीदार अवघड परिस्थितीतून जात असेल. जेव्हा जोडीदाराचे मतभेद किंवा किरकोळ वाद चुकीच्या दृष्टीकोनातून किंवा वाईटरित्या घेतले जातात तेव्हा नात्यात समस्या उद्भवण्यास सुरूवात होते.
ही स्थिती दोघांनाही केवळ नाते संबंधात तणावच जाणवत नाही तर गोष्टी अधिक कठीण बनवते. हे देखील एक मोठे कारण आहे की ज्यामुळे पार्टनरशी आपली अनुकूलता, बॉन्डिंग आणि प्रेम कमी होणे सुरू होते. पण आपली इच्छा असल्यास आपण आपल्या जोडीदारासह शांततापूर्ण संबंध बनवू शकतो. यासाठी काही खास गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते. जाणून घ्या नेमक्या कोणत्या गोष्टी नात्यातील शांतता कायम ठेवतात.
अंदाज बाजूला ठेवा : असे दिसून आले आहे की संबंध जस जसे जुने होत जातात, बहुतांश जोडपी एकमेकांकडे लक्ष देणे बंद करतात. जे कोणत्याही नात्यासाठी चांगले नसते. यामुळे जोडपी केवळ एकमेकांवर वर्चस्वच गाजवण्याचा प्रयत्न करण्यासोबतच छोट्या छोट्या गोष्टींवरुनही सतत वाद घालू लागतात. अशावेळी अस्वस्थ होऊन किंवा राग धरुन काम चालणार नसतं.
जर आपल्याला माहित असेल की आपल्या नात्यात काय चूक होत आहे किंवा कोणत्या कारणामुळे दोघांमधील अंतर वाढत आहे तर एकमेकांमधील कमी शोधण्याऐवजी त्या वादांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे अधिक योग्य ठरू शकतं.
अविश्वास दाखवू नका : नात्यात अविश्वास असा असतो जो कधीच तुम्हा पती-पत्नीला आनंदी ठेवू शकणार नाही. जर आपण आपल्या जोडीदारावर कोणत्याही प्रकारे अविश्वास घेत असाल तर आपले संबंध खराब करण्यास हे कारण पुरेसे आहे. संशयामुळे केवळ आपल्या दोघांचे नाते खराबच होणार नाही तर अशा परिस्थितीत एकमेकांसोबत जास्त काळ राहणंही कठीण होऊन बसेल.
अशा परिस्थितीत तुम्हालाला जोडीदाराच्या वागण्यात काही बदल दिसून येत असतील किंवा त्याची वागणुक विचित्र वाटत असेल तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना सांगा की त्यांच्या वागण्यात काही दिवसांपासून कोणता बदल दिसत आहे.
एकमेकांना दोष देऊ नका : नातेसंबंधात सर्वात कठीण समस्या तेव्हा येते जेव्हा जोडीदाराची एखादी गोष्ट मनात ठाण मांडून बसते. या काळात नात्यात न संपणारा राग व तणाव निर्माण होतोच पण आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी देखील जोडीदारालाच जबाबदार धरण्यास सुरुवात करतो. अशावेळी जोडप्यांनी एकमेकांची थोडीशी समजूत काढण्याची आवश्यकता असते.
या दरम्यान दोघांनाही त्यांच्या कम्फर्टमधून बाहेर पडणं आणि एकमेकांना खास फिल करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण जास्त दिवस एकमेकांबद्दलचा राग किंवा असामान्य वागणूक संबंध खराब करू शकते.
व्यक्त व्हा : बहुतांश लोकांना गोष्टी मनात ठेवण्याची सवय असते. पण अशं वागल्यामुळे जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्टी समजतच नाहीत. तुम्ही आनंदी किंवा दु:खी आहात हे आपण एखाद्याच्या चेह-यावरून सहज ओळखू शकतो पण त्यामागील कारण समजणं फार कठीण असतं. अशावेळी नातं मजबूत व शांततापूर्ण ठेवायचं असेल तर मनातील भावनांना वाट मोकळी करून द्या. एकमेकांसमोर व्यक्त व्हा, जेणे करून जोडीदाराला सुरक्षित वाटेल आणि तुमच्या मनातील प्रेम व आदरही दिसून येईल.