नवऱ्याला सोडून बायको सख्ख्या बहिणीसोबत हनिमूनला गेल्यावर करत होती तसले चाळे,नवऱ्याने पाहिल्यावर…

नवऱ्याला सोडून बायको सख्ख्या बहिणीसोबत हनिमूनला गेल्यावर करत होती तसले चाळे,नवऱ्याने पाहिल्यावर…

उत्तराखंडची राजधानी देहराडूनमधून एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आलं आहे. यात लग्नानंतरसाठी बूक करण्यात आलेल्या हनिमून पॅकेजवर पत्नी पतीला सोडून आपल्या बहिणीसोबत विदेशात फिरण्यासाठी गेली. पतीने 4.35 लाख रुपये खर्च करून हे पॅकेज घेतलं होतं.

यानंतर पतीने पत्नी, मेहुणी आणि हनिमून पॅकेज कंपनीच्या संचालकाविरुद्ध पटेल नगर पोलीस ठाण्यात गु-न्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित गर्ग यांनी सांगितलं की, 20 ऑक्टोबर 2021 रोजी सोनाक्षी बन्सलसोबत त्याचं लग्न झालं.

यानंतर अंकितने 13 डिसेंबर 2021 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीसाठी मालदीवमध्ये हनिमून पॅकेज घेतलं. यासाठी ट्रॅव्हल ट्रूप्स ग्लोबल कंपनीचे चेन्नईचे संचालक श्रीनाथ सुरेश यांना 4.35 लाख रुपये दिले. पण, हनिमूनला जाण्यापूर्वीच पत्नी माहेरी गेली आणि परत आलीच नाही.

यादरम्यान दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी त्यांचा विभक्त होण्याचा निर्णय मान्य केला. त्यानंतर अंकितने कंपनीकडे बुकिंग रद्द करून रिफंडचा दावा केला. मात्र, कंपनीचे संचालक टाळाटाळ करत राहिले. 6 ऑगस्ट रोजी अंकितला सोनाक्षी आणि तिची बहीण इशिता बन्सल यांची मालदीव ट्रीपची एक पोस्ट इंस्टाग्रामवर दिसली.

अंकितला हे देखील कळालं की त्याच्या पॅकेजवर कंपनीने सोनाक्षी आणि इशिताला त्याच्या परवानगीशिवाय मालदीवला पाठवलं. या पॅकेजवर अंकितचं नाव काढून मेहुणीचं नाव नोंदवण्यात आलं. त्यामुळे हा विश्वासघात असल्याचं पीडित व्यक्तीने म्हटलं आहे. याप्रकरणी पतीने पोलिसांत तक्रारही केली आहे.

इन्स्पेक्टर सूर्यभूषण नेगी यांनी सांगितलं की, पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून आरोपी श्रीनाथ सुरेश, अंकितची पत्नी सोनाक्षी बसल आणि तिची बहीण इशिता यांच्या विरोधात गु-न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

Team Marathi Tarka

Related articles