Marathitarka.com

नवरा बायकोपेक्षा इतर महिलांकडे कसे आकर्षित होतात ! जाणून घ्या…

नवरा बायकोपेक्षा इतर महिलांकडे कसे आकर्षित होतात ! जाणून घ्या…

बऱ्याचदा असं होत असेल की, लग्नापूर्वी नवरीमुलीने होणाऱ्या नवऱ्याला ज्याप्रकारे आकर्षित केलेलं असतं, कालांतराने तसा चार्म तिच्यात रहात नसावा.. म्हणजे तिचं शृंगाराने सजलेलं रूप, तिचं लचकदार शरीराने चालणं, लाघवी बोलणं, लाजणं किंवा लाजून हसणं, आदी वर जो नवरा भाळलेला असतो त्याचा कधीतरी भ्रमनिरास होतो.

कारण ती नवरी मुलगी त्याच्या स्वप्नवत दुनियेच्या बाहेर येऊन जेव्हा संसाराच्या रहाटगाड्यात भरडून निघते, तेव्हा मग वास्तवातील तिच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन नवऱ्याला करवते, जे बऱ्यापैकी कठोर किंवा नीरस असते. तिच्यात शारीरिक बदलही झालेले असतात.

दुसरीकडे नवरोबा वयाने कितीही वाढलेला असो, त्याचं मन मात्र चिरतरुणच. आणि ते जर अजूनही स्वप्नवत दुनियेत वावरायचं म्हणत असेल तर, त्याचा भ्रमनिरास होतो.. हे अगदी प्रेमप्रकरणातील जोडप्यांबाबतीतही होऊ शकते.अश्या परिस्थतीत मग हे अतृप्त मन बाहेरच्या दुनियेत उड्या मारायला लागते.

दुधाची तहान ताकावर भागवली जाते. अश्यावेळी जाता येता किंवा कुठेही पुरुषाच्या नजरेत येणारी एखादी स्त्री जेव्हा कमनीय दिसत असेल, लचकदार चालत असेल, केसांच्या नाजूक बटा किंवा उडणारा दुपट्टा वारंवार सावरत असेल, बोलता चालताना शरीराची नाजूक हालचाल करत असेल, तर सहजच त्याच्या मनात प्रेमाचं भरतं येऊ शकतं.

हे असं वयाच्या काही काळापर्यंत चालत असावं. कालांतराने स्थळ काळ, वस्तुस्थिती आणि वयाचं भान येऊन हे भरारी घेणारं मन आपल्या घरट्यात स्थिरस्थावर होत असावं.

Team Marathi Tarka