खरंच नवरा-बायको एकमेकांशी एकनिष्ठ असतात का? घ्या जाणून…

हा प्रश्न पडतो त्याची कारणे समाजात आपण पहतो.घटस्फ़ोट हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.तालुका,जिल्ह्या किवा मोठ्या शहरात शेकडो लॉजिंग आहेत,लेडीज़ बार,स्पा,मसाज सेंटर ,पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी प्रसिध्द वे-श्-यां-चे व्यवसाय.ह्या सगळ्या ठिकाणी कोण लोक जातात.कोर्टात अनेक नवरा बायकोची भांडणे राजरोस पहायला मिळतात.
आपल्या देशात इतरांच्या तुलनेत एकनिष्ठ बायका अधिक मिळतील.नवरयांचे प्रमाणात सध्याच्या काळात परिस्थिती थोडी वेगळी असू शकते पण इतर देशांच्या तुलनेत नवरे सुध्दा अधिक एकनिष्ठ असण्याची शक्यता आहे.एकनिष्ट असणे आवश्यक आहे.त्यामूळे बरयाच भानगडी मिटतात.एकमेकांना फसवीण्यासाठी सतत खोटे बोलावे लागते.पैशांची सोय करावी लागते.
काळ वेळ यांचे सतत गणित मांडावे लागते.नेहमी वेगळ्याच विश्वात रमत असल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.शरीराची आणि मनाची अवस्था बिघडण्यास कारणीभूत ठरते.आरोग्य ढासळू शकते.लै-गि-क आजार निर्माण होऊन समाजात छि थू होऊ शकते.कधितरी लफडे उघडकीस येऊन घटस्फ़ोटा पर्यंत मजल जाऊन मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.ह्या सगळ्याचा विचार केला तर नवरा बायको एकनिष्ट अधिक प्रमाणात सापडतील.
स्री ही अधिक सोशिक,समाधानी असते.त्यात लग्न झाल्यानंतर एक दोन वर्षात मुल झाले की ती थंड होते तीला निसर्गतः ही देणगी मिळालेली आहे.गृहिणी असल्यामुळे ती कामात गर्क असते असले विचार करायला तिच्यातली आई,बहिण,वहिनी असली नाती तीला मनाई करत असतात.नवरे कंपनी नेहमी प्रयत्नात असतात.पण त्यांना सुध्दा जबाबदारीची जाणीव असल्यामुळे व वयानुसार ह्या सवयी पासुन फारकत घ्यावी लागते.
ज्यांचे व्यवसाय स्री यांशी संबंधित असतात त्यांच्या कडून ही एकनिष्टता बाधित होत असेल.तसेच जेव्हडा समाज खालचा किवा उच्चभृ असेल त्यांचे मध्ये एकनिष्टतचे प्रमाण कमी सापडेल.मध्यम वर्गिय हा नेहमीच सगळे निती नियम्ं,कायदे पाळत असतो तो ह्या बाबतीत कसा मागे राहिल.
शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे. लग्ना आधी ज्यांना वाईट सवयी लागलेल्या असतात त्यांना सुधारायला जरा वेळ लगतो.तसेच ज्यांची प्रकृति उष्ण आहे ज्यांना पिण्याचे व्यसन आहे,घरात नवरा हवी तेवढी साथ देत नाही अशा परिस्थितीत एकनिष्ट विचार डळमळीत होऊ शकतात.वयाच्या तिस ते चाळीशीत असले उद्योग लोक करतात त्या नंतर सहसा ह्या भानगडीत पडत नाहीत कारण मुले मोठी झालेली असतात.