Marathitarka.com

नात्यात या गोष्टी नेहमी कराव्यात यामुळे नातेसंबंध घनिष्ट होतील ! जाणून घ्या…

नात्यात या गोष्टी नेहमी कराव्यात यामुळे नातेसंबंध घनिष्ट होतील ! जाणून घ्या…

नातेसंबंध अधिक घनिष्ठ होण्यासाठी प्रत्येकाने सर्वप्रथम आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार यांमध्ये विश्वासार्ह पात्र होणे आवश्यक आहे. विश्वासार्ह होण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन असते आणि त्यासाठी आपण खालील गोष्टी करणे आवश्यक असते.

1) संवाद – दोन्ही बाजूंनी झालेला सकारात्मक, वेळोवेळी केला गेलेला, कोणतीही अपेक्षा नसलेला संवाद असेल तर नातेसंबंध घनिष्ठ तर होताच पण वेळोवेळी न मागता आपल्याला मदत मिळते.

2) समपर्ण वृत्ती – येथे आर्थिक समर्पण अभिप्रेत नाही तर आपल्या नातेसंबधात मजबुती आणण्यासाठी आपण केलेला त्याग ही बाब अपेक्षित आहे. उदा. आपल्या शहरातील भावाकडे आपला मुलगा शिकतो आणि आपल्या भावाला परदेशात जाण्याचा योग आला आणि तो त्याने टाळला. कारण पर्यटनासाठी केव्हाही जाता येईल पण मुलाचे दहावीचे एकदाच येईल.

3) लपवाछपवी न करणे – उगाच काहीतरी सिद्ध करण्यासाठी, एखाद्याला माहिती न देण्यासाठी आपण नातेसंबधात खोटे बोलणे, बनवाबनवी, लपवाछपवी करणे टाळणे आवश्यक आहे.

4) संकटातील मदत – ज्यावेळी आपला हृदयस्थ जवळची व्यक्ती आपल्याला मदत मागते त्यावेळी, ते संकटात असतांना कोणताही विचार न करता जमेल ती मदत करा. उदा. एका मित्राने तुम्हाला फोन केला आणि सांगितले की तिचे बाबा रुग्णालयात आहेत आणि त्यांना मदत हवी आहे. अशा वेळी शक्य असेल तर त्या ठिकाणी त्यांना भेट द्या, यथाशक्ती मदत करा.

5) व्यवहारातील चोखपणा – आपण नातेसंबधात कोणताही आर्थिक व्यवहार करत असाल तर चोख व्यवहार ठेवा.उदाहरणार्थ – पैसे वेळेवर परत करणे, आपल्या आस्थापनेत जर आपल्या नात्यातील अथवा जवळची व्यक्ती काम करत असेल तर त्यांना देण्याचा कामाचा मोबदला अथवा मेहनताना हा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आपल्या आस्थापनेच्या नियमानुसार असावा. यामुळे आपल्याबद्दल विश्वास निर्माण होईल.

Team Marathi Tarka