नाते टिकवून ठेवणे का अवघड असते?जाणून घ्या…

दिवसेंदिवस नाते संबंध टिकवणे अवघड होत चालले आहे.एक जमाना होता संपूर्ण गावच एका कुटुंबाचा भाग असायचा. माणुसकी, भाईचारा, आपुलकी ओतप्रोत भरलेली असायची. आई वडिलांच्या पेक्षा काका काकू ला अधिक प्रमाणात महत्व दिले जायचे आता चित्र बदलले आहे.स्वतः च्या आई वडिलांच्या बाबतीत मुले उदास आहेत.
सर्वात महत्वाची प्रेम, सहानुभूती ही दोन तत्त्वे प्रत्येकाच्या जीवनात असायला हवेत. सध्या देशात वाढते वाद विवाद, रक्ताच्या नात्यात मारहाण, हत्या अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.प्रॉपर्टी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यापुढे सर्व नातीगोती व्यर्थ आहेत. सकाळी वर्तमान पत्र उघडले की मुलाने आई वडिलांची ह-त्-या केली.
भावा भावांच्या भांडणातून ह-त्-या, पती पत्नी मध्ये विश्वास राहिला नाही. याला कुठलाही समाज अपवाद नाही.माणूस सैतान होत चालला आहे. स्वतः च्या स्वार्थासाठी दुसर्याचा विचार त्याच्या मनात येत नाही.घटस्फोटित महिला, वृद्धांच्या हालअपेष्टा, विभक्त कुटुंब पद्धतीने समाज ढवळून निघाला आहे.
माणुसकी, बंधुभाव शोधून सापडत नाही.जी नाती पूर्वी सहज जपली जायची ती आता टिकवणे अवघड का झाली आहेत याचे उत्तर बाहेर शोधण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्यातच शोधले पाहिजे.या गोष्टीमुळे नाते टिकवणे सद्याच्या घडीला अवघड झाले आहे.