मुलींना लग्नानंतर आपल्या नवऱ्याकडून काय काय अपेक्षा असतात? जाणून घ्या…

मुलींना लग्नानंतर आपल्या नवऱ्याकडून काय काय अपेक्षा असतात? जाणून घ्या…

बायकोची इच्छा असते की लग्नानंतर नवरा तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करेल, आयुष्यभर तिला साथ देईल.पण कधी कधी हि अपेक्षा भंग पावते. लग्नानंतर स्त्रीला जे करायचं असतं ते करायला मिळत नाही. तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुटून पडतात.अशावेळी नवऱ्याने आपल्याला सपोर्ट करून धीर द्यावा अशी तिची इच्छा असते.

ती कधीच स्पष्टपणे ते बोलून दाखवणार नाही. ही गोष्ट नवऱ्याने ओळखून तिला साथ द्यावी अशी तिची भावना असते.अरेंज्ड मॅरेज लग्नानंतर घर व जबाबदाऱ्या यांमध्ये नवरा आणि बायको दोघेही इतके अडकतात की त्यांच्याकडे स्वत:साठी वेळ नसतो.

बायका या संवेदनशील असल्याने त्या गोष्टीकडे त्या दुर्लक्ष करू शकत नाहीत. नवऱ्याने आपल्यासाठी आणि स्वत:साठी एक खास वेळ काढावा अशी त्यांची मनापासून इच्छा असते.अनेक बायकांच्या मनात हि गोष्ट असते. यामागे दोन प्रमुख करणे असतात. पहिले कारण तर हे की नवरा हा वारंवार अनेक गोष्टींवरून आईसोबत बायकोची तुलना करत असतो.

दुसरे कारण हे आहे की नवरा बायकोवर पूर्णपणे निर्भर असतो, जसे ते आपल्या आईवर अवलंबून असतात. त्यांची इच्छा असते की बायकोने आपली आपल्या आईसारखी काळजी घ्यावी.जसे की ऑफिससाठी कपडे तयार करणे, जेवण देणे, जेवण तयार करणे, घरची सगळी कामे करणे इत्यादी.

परंतु नवऱ्याला हे समजून घेतलं पाहिजे की शेवटी ती आपली बायको आहे. ती आईसारखंच वागेल याची शाश्वती नाही आणि तशी वागण्याची तिची इच्छाही नसू शकते. म्हणून नवऱ्याने देखील ही अपेक्षा बायकोकडून ठेवू नये आणि तिला समजून घ्यावे.

Team Marathi Tarka