मुलींना या प्रकारचे मुले अधिक आवडतात ! घ्या जाणून…

मुलींना या प्रकारचे मुले अधिक आवडतात ! घ्या जाणून…

अनेकदा असं होतं की काही पुरूष खूप हूशार तर काही दिसायला फारच देखणे असतात तरीही महिला त्यांच्याकडे आकर्षीत होत नाहीत. त्यामागील कारणांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आज जगभरात 2021 साजरा केला जात आहे. म्हणून आज पुरूषांमध्ये कोणत्या सात क्वालिटीज महिलांना जास्त आकर्षीत करतात. याबाबत सांगणार आहोत.

1) हूशार तरूण : जे पुरूष स्मार्टनेस वापरून बोलतात. ज्यांची विनोदबुद्धी अप्रतिम आहे. त्यांचे शब्द, विनोद राजकारण किंवा जगातील कोणत्याही विषयावरील असोत, इतके मनोरंजक असतात की प्रत्येकाला ते लक्षपूर्वक ऐकावेसे वाटते. तासनतास त्यांच्यासोबत बसूनही कोणाला कंटाळा येत नाही.

कोणत्याही नात्यात सुंदरतेबरोबरच बौद्धिक जोड असणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा ते नाते फार लवकर कंटाळवाणे होते.त्याच वेळी, दोन बुद्धिमान लोकांमधील संबंध दीर्घकाळ टिकतात. स्त्रिया नेहमीच बुद्धिमान पुरुषांकडे आकर्षित होतात.

2) आत्मविश्वास : असे पुरुष प्रबळ इच्छाशक्तीचे असतात. त्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो. ते कधीही असुरक्षित भासत नाहीत. शक्ती आणि नियंत्रण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून दिसून येते. त्यांना इतर पुरुषांचा हेवा वाटत नाही, परंतु त्यांना पत्नी, सहकारी किंवा मित्रांकडून धोकाही वाटत नाही.

त्यांचा आत्मविश्वासपूर्ण स्वभाव महिलांना आवडतो. स्त्रिया आत्मविश्वासू पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. असे पुरुष कोणत्याही बाबतीत महिलांवर अवलंबून नसतात. महिलांवर त्यांचे निर्णय लादत नाहीत आणि त्यांना भरपूर स्वातंत्र्यही देतात.

3) विदेशी किंवा इतर संस्कृतीतील पुरूष : स्त्रियांना या प्रकारचे पुरुष खूप आवडतात. त्यांची बोलण्याची पद्धत आणि जगाकडे पाहण्याची वेगळी पद्धत त्यांना आकर्षित करते. महिलांना त्यांच्या चालीरीती आणि दैनंदिन व्यवहार थोडे विचित्र वाटत असतील, पण त्यांना त्यांचे इतके व्यसन लागते की त्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

जिज्ञासू प्रवृत्ती असलेले पुरुष मुलींना छान आणि मोहक वाटतात. कधी-कधी त्यांचे परदेशी असणे मुलींना आकर्षित करते. वेगळ्या संस्कृतीत वाढणे आणि नवीन संस्कृती जाणून घेणे त्यांना जवळ आणते.

4) बिंधास्त पुरूष : अनेकदा स्त्रिया बिंधास्त स्वभावाच्या पुरुषांकडे आकर्षित होतात. त्यांचे साहस, मग ते बाईक चालवणे असो, ऑफिसमधून भेटण्यासाठी पळून येणं असो किंवा काही छान काम करणे असो. स्त्रियांना असे वाटते की अशा पुरुषांना जगातील इतर कशाचीही पर्वा नसते. अनेकदा ते या गोष्टीने खुश होतात. बिंधास्त पुरुषांची बोल्ड स्टाइल त्यांना भुरळ पाडते.

5) संवेदनशील पुरूष : असे पुरुष महिलांच्या भावना समजून घेतात आणि त्यांना आदर देतात. उदा. अशी माणसं तुमच्यासाठी कारची लिफ्ट देतात. जेवणासाठी खुर्ची स्वत: देतात आणि रात्रीच्या जेवणाचे बिलही देतात. तुमची गैरसोय होऊ नये याची ते काळजी घेतात. महिलांना आदर देण्याची सवय आकर्षीत करते.

Team Marathi Tarka