मंगळसूत्रात दोन वाट्या का असतात?जाणून घ्या…

मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे की जेणे करून ते घात ल्यावर वाट्या बरगडी संपून पोट सुरु होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तेथे अनाहत चक्राचे स्थान असते.अनाहत चक्र मनाशी निगडीत असते.
मंगळसुत्रातील वाटी ही गोलाकार घुमट वाटीतून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढते. त्यामुळे मन शांत राहते व स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. लग्न झाल्यावर स्त्री नवर्याचे घरी जाते. जेथे तिला जुळवून घ्यायचे असते.तेथे स्त्रीने व्यवस्थित जुळवून घेतले तरच संसार निट होतो अन्यथा गृहकलह वाढून संसारच मोडण्याचा धोका असतो.
मंगळसूत्रातील ही वाटी अनाहत चक्रावर आल्यामुळे स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. नवीन घरात गेल्यावर स्त्रीला याची नितांत गरज असते. आत्मिक शक्ती वाढली की तिचा प्रभाव इतरांवर पडतो. तिच्या इच्छा न सांगताच समजून घेतल्या जातात व पूर्णही केल्या जातात. तशी इच्छा त्यांना आपोआपच होते. हे आत्मिक शक्तीचे बळ आहे. तिला अनेकदा आपल्या इच्छा सांगाव्याही लागत नाहीत.
हे आत्मिक शक्तीचे बळ स्त्रीला मिळावे म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली.हे मर्म न समजल्यामुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्र वापरत नाहीत. समाजात संसारात कलह वाढले आहेत. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.ज्या स्त्रियांना मंगळसूत्र वापरायची इच्छा नाही त्यांनी आपल्या अनाहत चक्रावर एक इंची पिरामिड कायम ठेवावा.
पिरामिड मधील शक्ती सुद्धा त्या स्त्रीचे आत्मिक बळ वाढवेल व संसार सुरळीत व्हायला मदत करेल.आपल्याकडील प्रथेप्रमाणे स्त्री ही नवर्याच्या घरी जात असल्याने तिला जास्तीतजास्त जुळवणूक करावी लागते मात्र पुरुषांना तिच्या उलट पत्नीला आपल्या घरी आणायचे असल्याने तसेच कामासाठी दिवसातील बराच वेळ घराबाहेर असल्यामुळे त्याला याची गरज स्त्री एवढी नसते.
आपल्या पूर्वजांनी मानसोपचार तज्ञ, कौन्सिलर अशी ऑफिस न थाटता, धंदा न करता, त्याचे पेटंट न घेता सामान्य माणसांचे, स्त्रीचे, तिच्या कुटुंबाचे हित बघितले. त्यामुळे सध्याच्या पैशाच्या युगात त्यांना आपण अडाणी समजतो. मात्र त्यांनी ही प्रथा पडून अनेक पिढ्या, असंख्य कुटुंबांचे कल्याण केले. आणि आपण आधुनिक शास्त्राला अनुसरताना आपले कल्याण करणाऱ्या आपल्या पूर्वजांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या चांगल्या उपयुक्त प्रथांना कमी लेखतो.