महिलेचं दुखायला लागलं पोट गेली दवाखान्यात, तिथं गेल्यावर पोटामध्ये सापडलं…

महिलेचं दुखायला लागलं पोट गेली दवाखान्यात, तिथं गेल्यावर पोटामध्ये सापडलं…

अनेकदा आपण एखादा व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्या बाबतीत विचित्र घटना ऐकत असतो आता एक घटना अशीच उघडकीस आली आहे. एका महिलेच्या पोटातून एक विचित्र असा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना नेमकी कुठली आहे कशी आहे आणि काय आहे. याबद्दल जाणून घेऊया.

ही घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोलीच्या सगरोळी येथील आहे. सगरोळी येथे कल्पना नावाची एक महिला गेल्या अनेक दिवसापासून राहते. तिचे वय 35 च्या आसपास आहे. तिला गेल्या अनेक दिवसापासून पोटामध्ये दुखत होते. तिने अनेक डॉक्टरांना दाखवले.मात्र त्यावर काही उपचार झाला नाही. मात्र एक दिवस तिचा त्रास हा प्रचंड वाढू लागला.

त्यामुळे तिने तातडीने चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कल्पना ही नांदेड येथील गोवर्धन घाट परिसरातील तोटावर यांच्या रुग्णालयात गेली. तोटावर रुग्णालयात तिच्या सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर तेथील डॉक्टर तोटावार यांनी महिलेची सोनोग्राफी केली. या सोनोग्राफीमध्ये कल्पना हिच्या पोटात मोठा गोळा असल्याचे दिसले.

डॉक्टरांनी कल्पनांच्या नातेवाईकांना कल्पना देऊन याबाबत माहिती सांगितली. त्यानुसार त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर महिलेच्या पोटातून तब्बल 30 किलोचा गोळा करण्यात आला. तिची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर तिला खूप चांगले वाटले. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. तिला काही दिवसानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.

Team Marathi Tarka

Related articles