महिलांना या पुरुषांची करायचे असते लग्न…

महिलांना या पुरुषांची करायचे असते लग्न…

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या-न्-कोणत्या गोष्टींचा राग येतोच, कारण त्या गोष्टी तो अजिबात सहन करू शकत नाहीत. महिला व पुरुषांबाबत सांगायचे झाले तर, काही महिला विशिष्ट प्रकारच्या पुरुषांपासून दूर राहणेच पसंत करतात. तर पुरुषही विशिष्ट प्रकारच्या महिलांपासून स्वतःला दूर ठेवतात.

पुरुषांना महिलांच्या काही सवयी अजिबात आवडत नाहीत, ज्यापासून ते अनेकदा दूर राहण्याचा पर्याय निवडतात. अशा महिला जोडीदार झाल्यानंतर त्यांच्या सवयी लक्षात आल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्यास वेळ लागत नाही.तुमच्यातही अशा सवयी असतील तर त्या सुधारण्याची गरज आहे, अन्यथा लग्नाच्या बाबतीत तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो.

दुर्लक्ष करण्याची सवय : काही तरुणींना सतत आपल्या बॉयफ्रेंडच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. जोडीदाराने आपल्या मागे-मागे करावे, याकरीता काही महिला त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण अशा महिलांची ही सवय त्यांच्यावर भारी पडू शकते. पुरुष अशा महिलांपासून दूर पळू लागतात.

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असेच वागत असाल तर लवकरच ते तुमच्यापासून दूर होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या प्रियकराला किंवा कोणत्याही मुलाला तुमच्या इशाऱ्यावर नाचवण्याचा विचार करत असाल तर काही काळानंतर ते स्वतःला या नात्यातून मुक्त करण्याचे ठरवतील.

हुकूम गाजवणाऱ्या महिला : पुरूषांना हुकूम गाजवणाऱ्या स्वभावाच्या महिला आवडत नाहीत. तसेही पुरुषांमध्ये अहंकार जरा जास्तच असतो आणि तो पटकन दुखावलाही जातो. अहंकार ही चांगली गोष्ट नाही, परंतु जेव्हा तुम्ही त्यांना हुकूम देण्यास सुरुवात करता तेव्हा त्यांचा स्वाभिमानही दुखावतो. जर तुमचा स्वभाव असा असेल तर तुम्हाला तो बदलायला हवा नाहीतर तुमचा बॉयफ्रेंड लग्नाचा विचार करू शकणार नाही.

छोट्या छोट्या गोष्टींचा हेवा वाटणे : रिलेशनशिपमध्ये थोडासाही मत्सर-द्वेष योग्य मानला जात नाही. पण या सवयीने मर्यादा ओलांडली तर पुरुष अशा महिलांपासून दूर पळतात. आवश्यकतेपेक्षा अधिक हेवा वाटणे, ही गोष्ट महिलांना आवडत नाही. त्यामुळे तुमची ही सवय पुरुष सहन करतील अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. सतर्क राहणे महत्त्वाचे आहे, पण तितकेच आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणेही महत्त्वाचे आहे.

खासगी वेळेत लुडबुड करणं : आपण सतत आपल्या जोडीदाराबरोबर राहावे, अशी इच्छा एखाद्या महिलेनं बॉयफ्रेंडजवळ व्यक्त केली तर सुरुवातीला त्याला चांगलं वाटेल. पण कालांतरानं याचा त्याला कंटाळा येऊ शकतो.

आपल्या खासगी वेळेत कोणीही लुडबुड करू नये, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वारंवार फोन-मेसेज करून बॉयफ्रेंडच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत असाल तर त्याला ते मुळीच आवडणार नाही. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

Team Marathi Tarka