जास्त महिला गाऊनच का वापरतात? घ्या जाणून…

जास्त महिला गाऊनच का वापरतात? घ्या जाणून…

गाऊन हा जणू काही महिला वर्गासाठी वरदान आहे. कारण घालायला सोपा आणि वावरायला अगदी सहज होतं. त्यातही कॉटनचा गाऊन हा तर बेस्टच असतो.रोजच्या धावपळीच्या आयुष्यात महिलांना तासंतास घराबाहेर राहावे लागते.

त्यात आपल्याकडे पायाभूत सुविधांच्या नावाने बोंबाबोंबच असते.त्यामुळे घराबाहेर पडल्यावर महिलांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. काही महिलांना तरी घरी आल्यावर खासकरून चाळीत राहणाऱ्या महिला शौचालय बाहेर असल्याने अनेकदा खोळंबा असतो.अशा महिलांना पाळीच्या दिवसातही अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

अशावेळी बाहेरून थकून भागून आल्यावर किंवा पाळीच्या दिवसात कंफर्ट वेअर म्हणून गाऊन फारच उपयोगी पडतात.गाऊन किंवा नाईटीचा शोध कोणी लावला माहीत नाही. पण आज तरी समस्त महिलावर्गाला हे परिधान करणे मनापासून आवडते. प्रत्येकीच्या गरजांप्रमाणे गाऊनची खरेदी आणि तो घातला जातो.

काही महिलांना दिवसभर गाऊन घालायला आवडतो तर काही जणी एकत्र कुटुंब किंवा आवडी-निवडीमुळे फक्त झोपण्याआधी सुटसुटीत म्हणून गाऊन घालणं पसंत करतात. तसंच भारतातील उष्ण वातावरणात कॉटन गाऊन हा सर्वात सोपा वेश आहे.आज गाऊन शिवणाऱ्या आणि विकणाऱ्यांचीही बरीच मोठी इंडस्ट्री आहे, असं म्हणायला हरकत नाही.

अगदी 150 रूपयांपासून ते 1,000 च्या पुढे प्रत्येकीच्या बजेट आणि आवडीनुसार गाऊन बाजारात उपलब्ध आहेत. हव्या त्या मापानुसार आज गाऊन बाजारात तयार किंवा शिवून मिळतात. अनेक महिला रूग्णांनाही या गाऊनमुळे अनेक गोष्ट करणं सोपं ठरतं.

Team Marathi Tarka