Marathitarka.com

महिलेचे मन आपल्याकडे वळवण्यासाठी काय करावे ? घ्या जाणून…

महिलेचे मन आपल्याकडे वळवण्यासाठी काय करावे ? घ्या जाणून…

आपल्याकडे रूढ मूर्खपणा इतका जास्त आहे की, स्त्री आणि स्त्रीचं मन ह्यांना जिंकण्याबद्दल खूप वेळा लोक एकतर वाशिकरणाचा विचार करतात, किंवा स्त्रीला वारंवार वैताग देऊन किंवा सतत आपल्या इच्छा किंवा इंटरेस्ट व्यक्त करून तिचा होकार मिळवायचा प्रयत्न करतात.ह्यामुळे असे प्रश्न विशेष असतात. पण ह्याला नीट दृष्टिकोनातून बघायला पाहिजे.

पहिला मुद्दा तुम्ही हा समजून घ्या, की स्त्रीचं मन कुणीही वळवू शकत नाही. स्त्रीचं मन कुणाची हुकूमत नाही. पण ह्यात एक विशेष मार्ग आहे. तो मार्ग आहे स्त्रीचं सं-भो-गा विषयी जे मन असतं त्यातली कामना, वासना, आणि नेमका कसा पुरुष हवा ह्याबद्दल असलेलं कन्फ्युजन.

मी पुन्हा स्पष्ट पणे सांगतो, ह्या कन्फ्युजन चा आधार घेऊन अनेक तंत्रविद्येचे साधक आपली कामं करून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण मी कार्य साधण्याचा नाही, प्रेम आणि सहजीवन ह्याचा मार्ग सांगतोय.कुठल्याही स्त्रीला खोलवर जाणीव असते की तिची चेतना तिच्या शरीर आणि मुख्यत्वे तिच्या योनी शी निगडित असते.

पण प्रत्येक स्त्रीच्या ठायी अशी प्रेरणा असते की ती तिच्या योनी च्या फुलाची भेट त्या पुरुषाला देईल जो तिला अतिविशिष्ट वाटेल. प्रश्न एवढाच आहे, की तुम्ही खरंच विशेष आहात का?स्त्रीला विशेष आकर्षण वाटतं, ते अशा पुरुषाचं, जो तिला प्रभावित करायचा मुळीच प्रयत्न करत नाही.

जर तुम्ही स्त्रीला प्रभावित करायचा प्रयत्न कराल, तर ती असं सहज मानू शकेल की तुम्ही केवळ तिला प्रभावित करण्यासाठी सगळं करत आहात. जणू काही तुमचं सगळं अस्तित्व, तुमची सगळी प्रेरणा, तुमचं सगळं कर्तृत्व फक्त दाखवून तिला खुश करण्यासाठी आहे का? स्त्रीच्या स्त्रित्वाकडे दुर्लक्ष न करता, आणि तिला प्रभावित करण्यासाठी काहीही न करता जर तुम्ही तुमच्या विचारातली, वागण्यातली, तत्वांमधली कुठलीही विशेषता, त्या स्त्री समोर आणू शकलात तर ती तुमची नोंद घेतल्याशिवाय राहू शकणार नाही.

कामसूत्र लिहिणारा कात्यायन म्हणून गेलाय, की आपल्या स्त्रीला प्रभावित करण्यासाठी पुरुषाने, तिच्यासमोर आपल्या बुद्धिवान मित्रांना, गहन तत्व आणि जीवनाचं सत्य ह्याविषयी वादविवाद करून हरवलं, तर त्यातून स्त्रीला जी विलक्षण प्रेरणा प्रेम आणि संभोग ह्यांची उबळ देते, त्याला दुसरी कुठलीही उपमा नाही.

Team Marathi Tarka