लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोसमोर ठेवली अशी अट, बायको पोहचली थेट न्यायालयात…

लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने बायकोसमोर ठेवली अशी अट, बायको पोहचली थेट न्यायालयात…

लग्नानंतर नवरा आणि बायको दोघांच्या आयुष्याची नवीन सुरूवात होते. ज्यानंतर हे दोघेही आपल्या भविष्याचे स्वप्नपाहू लागतात आणि आपला नवीन संसार थाटतात. त्यात लग्नाची पहिली रात्र देखील नवरा बायकासोठी खुप खास असते. परंतु तेव्हाच जर बायकोला आपल्या नवऱ्याचं घर सोडून जावं लागलं तर?

एक अशीच घटना झारखंडमध्ये घडली आहे, जेथे नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोला असं काही बोलला की, त्यानंतर बायकोला धक्का बसला. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरा मुलाखतीला जातो असे सांगुन घरातुन निघून गेला आणि 3 वर्ष झाली तरी नवरा घरी परतलाच नाही.

हे प्रकरण झारखंडमधील जमशेदपूरमधील आहे. येथे एका पतीनेने हनिमूनच्या पहिल्या रात्री पत्नीसमोर एक अट ठेवली, ज्यामुळे त्यांच्यी नव्या आयुष्याची सुरूवात होण्यापूर्वीच दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. वास्तविक, एमबीए पतीने आपल्या पत्नीसमोर आयएएस होण्याची अट ठेवली होती, ज्यानंतर नवरदेव त्या दिवसानंतर आजपर्यंत आपल्या बायकोसोबत बोलला नाही.

ज्यामुळे बायकोला पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली.पल्लवीचा विवाह 18 जून 2018 रोजी परसुडीहच्या जयमल मंडलसोबत हिंदू रितीरिवाजांनुसार झाला. जयमलने एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर तो लखनऊमधील एका बँकेत व्यवस्थापक आहे.

लग्नानंतर जयमलने हनिमूनलाच पल्लवीसमोर एक विचित्र अट घातली. त्याने पल्लवीला सांगितले की, जर तू 2 वर्षात स्वत:ला आयएएस बनवून दाखवशील तर हे लग्न चालेल नाहीतर दोघेही पती-पत्नी राहणार नाहीत. जयमल जेव्हा हे बोलला तेव्हा पल्लवीला तो विनोद करत आहे असे वाटले.

पण दुसऱ्याच दिवशी जेव्हा जयमल एका मुलाखतीला जातोय असे बोलून घरातून निघून गेला आणि पुन्हा घरी आलाच नाही.पल्लवीने पोलिसात सांगते की, त्यानंतर जयमलने तिला फोनही केला नाही आणि जर कधी पल्लवीने प्रयत्न केला तर जयमल तिच्यासोबत बोलायचा नाही.

समाजाच्या भीतीपुढे पल्लवीने ही गोष्ट बराच काळ सर्वांपासून लपवून ठेवली. त्याचवेळी सासरच्या लोकांनीही तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली.त्यानंतर काही दिवसांनी पल्लवलीला समजले की, जयमलने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली.

पल्लवीला सासरच्या घरात खूप अ’:- त्’:- या’:- चा’:- र सहन करावा लागला. पल्लवी म्हणाली, इथे राहून मला नाती जपायची होती. पण तसे झाले नाही, या लोकांचा अत्याचार वाढतच गेला, तर नवरा त्याच्या अटीवर ठाम राहिला.आता लग्नाला तीन वर्षे झाली, पण नवऱ्याने तिला अद्याप पत्नीचा दर्जा दिलेला नाही. तिचे ध्येय साध्य करण्यासाठी ती अभ्यास करत आहे. पण आता तिलाही तिच्या पतीला शिक्षा करायची आहे.

Team Marathi Tarka

Related articles