Marathitarka.com

लग्नानंतर या कारणांमुळे होतात महिला जाड ! घ्या जाणून…

लग्नानंतर या कारणांमुळे होतात महिला जाड ! घ्या जाणून…

लग्नानंतर येणारा जाडपणा अनेकांच्या मनोरंजनाचा विषय बनतो. लोकांना या जाडपणाचे खूप आकर्षण असते. ते म्हणजे लग्नानंतर मुली लठ्ठ का होतात.तर घ्या मग जाणून…

अनुवंशिकता : बहुतेक वेळा लठ्ठ पणा हा अनुवंशिकता मुळे येण्याची शक्यता असते. अनुवंशिकता म्हणजे जर आई वडील जाड असतील तर त्यांचे होणारे बाळ सुद्धा जाड असते. म्हणून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.जाडपणा कमी करण्यासाठी व्यायाम करा, सकस आहार घ्या, आणि वेळोवेळी डॉक्टरचा सल्ला घ्या.

ताणतणाव : माहेर हे मुलींचे हक्काचे घर असते. ते सोडून लग्नानंतर सासरी जाणे हे प्रत्येक मुलीकरिता अवघड असते. सासरी गेल्यावर नवीन लोकांमध्ये स्वतःला मिसळून घेणे, बहुतेक वेळा तारेवरची कसरत ठरते. तसेच सासरी नवीन घरात रमायला पण वेळ लागतो. या भीतीमुळे सुद्धा अनेक मुलींना ताणतणावाला समोर जावं लागत. याचा अप्रत्यक्ष परिणाम वजन वाढीवर होतो.

बाहेरचे जेवण : नवविवाहित जोडपे जेवण बाहेर करण्यास जास्त पसंती देतात. हॉटेल मधील पदार्थ खाणायची शरीराला सवय होऊन जाते. सतत बाहेरचे खाल्ल्याने शरीरात चरबी आणि कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते आणि जाडपणा येतो.

वेळेवर झोप : लग्नानंतर मुलींचे झोपेचे वेळापत्रक बदलते. बदललेल्या जीवनशैलीमुळे मुलींना पुरेशी झोप घेण्यास मिळत नाही. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.

Team Marathi Tarka