लग्नानंतर बायको गेली माहेरी, नवऱ्यानं पटवली दुसरी बाई,अन मग नंतर सगळे मिळून…

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये दोन पत्नींनी पतीची वाटणी केली आहे. पहिली पत्नी लॉकडाऊनमध्ये माहेरी गेली असताना इंजिनीयर पतीचं ऑफिसमधल्याच एका महिलेशी सूत जुळलं. दोघांनी लग्न केलं. याबद्दल समजतात पहिली पत्नी संतापली. अखेर दोघांमध्ये न्यायालयाबाहेर समझोता झाला.
दोन्ही पत्नींनी करार करत पतीची वाटणी केली.हरयाणाच्या गुरुग्राममध्ये इंजिनीयर म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा 2018 मध्ये सीमा नावाच्या 28 वर्षांच्या तरुणीशी विवाह झाला. दोन वर्षे दोघे एकत्र राहिले. त्यांना एक मुलगा झाला. 2020 मध्ये करोना संकटामुळे सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली.
यानंतर पतीनं सीमाला तिच्या माहेरी सोडलं आणि तो घरात एकटाच राहू लागला.या कालावधीत पतीचे त्याच्या ऑफिसमधील एका महिला सहकाऱ्याशी प्रेमसंबंध जुळले. पत्नी माहेरी गेली असताना पतीनं ऑफिसमधील तरुणीशी लगीनगाठ बांधली. काही महिन्यांत त्यांना एक मुलगी झाली. पतीच्या लग्नाबद्दल समजताच सीमा संतापली. ती घरी परतली. दोघांमध्ये वाद झाला.
सीमा पुन्हा ग्वाल्हेरला आली. तिनं पतीविरोधात गुन्हा दाखल करत मुलासाठी आर्थिक मदतीची मागणी केली.दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं. त्यांच्यात अनेकदा संवाद झाला. मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक मदतीची गरज असल्यानं वेगळा मार्ग काढायला हवा, असं पतीनं सीमाला सांगितलं. वकील हरिश यांनी दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणली.
पतीनं दोन्ही पत्नी आणि मुलांना वेळ देण्याची अट मान्य केली. त्यासाठी लिखित स्वरुपात तडजोड केली. त्यानुसार आठवड्याचे पहिले तीन दिवस पती पहिल्या पत्नीसोबत, तर नंतरचे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबक राहील. रविवारचा दिवस त्याला हवा तसा, स्वत:साठी घालवता येईल. दोघींना गुरुग्राममध्ये दोन स्वतंत्र फ्लॅट्स देण्यात आले आहेत.