लग्नाआधी प्रियकरासोबत तसले संबंध ठेवणे योग्य की अयोग्य ? घ्या जाणून…

लग्नाआधी प्रियकरासोबत तसले संबंध ठेवणे योग्य की अयोग्य ? घ्या जाणून…

लग्नाअगोदर प्रेमसंबंध असणे असणे हे तितके वाईट नाहीये. आज काल शिक्षण आणि करिअर ला प्राधान्य असल्यामुळे लग्नं उशिरा होतात आणि बहुतांश लोकांचे वेगवेगळ्या मर्यादा राखून लग्नाअगोदर प्रेमसंबंध असतात. त्यांतील काही लग्नापर्यंत पोहोचतात, तर काही पोहोचत नाहीत. शेवटी ज्याच्या त्याच्या नशीबाचा भाग आहे तो.

पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर नक्की करता येईल कि नवीन नाते सुरु करताना जुने नाते पूर्णपणे संपवणे. हे किमान अपेक्षित आहे. जर जुने नाते पूर्णपणे संपवलेच नाही तर नवीन नात्याची खरी सुरुवात कशी होईल? तसेच लग्नाअगोदर असलेल्या रेलशनशिप चा उल्लेख हा आपल्या होणाऱ्या नवरा / बायको समोर एकदा तरी करावा, ते हि लग्नाअगोदरच्या भेटीत.

काही लोकांना लग्नाअगोदरचे संबंध पटतात काहींना पटत नाहीत पण त्यांना ते जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण तुम्ही पुढचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवणार आहात. त्यांना तुम्ही खरंच पसंद असाल तर तुमच्या सगळ्या गुणदोषांसहित ते तुम्हाला स्वीकारतील आणि तसं नसेल तर नाही स्वीकारणार. यात कोणाचेही नुकसान नाही आणि कोणीही दुय्यम नाहीं.

पण हेच सगळे विषय लग्नानंतर बोलता बोलता समोर आले किंवा आपोआप समजले तर कदाचित हे झेपण्यासारखं नसेल. मुद्द्दा हा नाहीये कि त्यांना कुठून तरी समजल्यावर काय होईल, मुद्दा हा आहे कि लग्नानंतर दोघांमध्ये खूप प्रेम निर्माण झालं आणि मग आपण लपवलेली गोष्टच आपल्याला आतून खायला लागली तर त्या वेदना असह्य असतील.

Team Marathi Tarka