Marathitarka.com

लग्न झाल्यावर नववधू अर्ध्या रस्त्यातूनच प्रियकराचा हात पकडून झाली फरार,नंतर झाले असे…

लग्न झाल्यावर नववधू अर्ध्या रस्त्यातूनच प्रियकराचा हात पकडून झाली फरार,नंतर झाले असे…

मध्य प्रदेशच्या सतनामध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एका नववधूने होणाऱ्या नवऱ्यासोबत सात फेरे घेतले आणि जेव्हा मुलगी पाठवणीची वेळ आली तेव्हा तिने प्रियकराचा हात पकडून पलायन केले. यानंतर वऱ्हाडींनी पोलीस ठाणे गाठून नववधू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

यानंतर पोलिसांनी नववधूला शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांना ती सापडली आणि जिल्हा न्यायालयात हजरही करण्यात आले. यावेळी तिने 18 वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच स्वत:च्या मर्जीने प्रियकरासोबत गेल्याचे म्हटले.

तरुणीचे लग्न उत्तर प्रदेशमधील बांदा येथील तरुणाशी ठरले होते. 13 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले, त्यानंतर तिला सासरी पाठविण्यात आले. जेव्हा नवऱ्याचा कारमध्ये बसून ती सासरी जात होती, तेव्हा रस्त्यात एक तरुण स्कूटरवरून आडवा आला. त्याने कुऱ्हा़ड दाखवून कार थांबवायला लावली नववधूला कारमधून उतरवून तो तिला घेऊन पसार झाला. लग्नाचे ठिकाण या घटनास्थळापासून अर्धा किमीवरच होते.

यानंतर नववधूच्या पित्याने पोलिसांत जाऊन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली, मात्र पोलिसांनी तिचे वय पाहून हरविल्याची तक्रार नोंद केली.15 डिसेंबरला ती आपल्या प्रियकरासह कोर्टात हजर झाली. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे

Team Marathi Tarka

Related articles