लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायची लागली होती हौस, पण भेटला असा भयानक प्रियकर…

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायची लागली होती हौस, पण भेटला असा भयानक प्रियकर…

नालासोपारा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीची ह’ त्या केली.प्रियकराचा रोजगार गेला म्हणून तो गावाकडे गेल्याने प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीशी सूत जुळवल्याचा राग मनात ठेवून हा प्रकार घडल्याचे समजते.पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून पुढील तपास तुळींज पोलीस करत आहे.

ज्योती गौतम असं ह’ त्या झालेल्या 23 वर्षीय तरुणीचं नाव असून तर अविनाश कुमार असं अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे.ज्योती आणि आरोपी अविनाश याचं मागील काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. आरोपी अविनाश हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता मात्र कोरोना प्रादुर्भावात त्याच्या हातचे काम निघून गेल्याने तो बेरोजगार झाला.

आरोपी अविनाश कोरोना काळात काम नसल्यामुळे आपल्या मुळ गावी उत्तर प्रदेशात गेला. त्यानंतर मृ’ त ज्योतीचे नालासोपाऱ्यातील दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि ती आपल्या दुसऱ्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून तिने आपल्याला दगा देत दुसऱ्याशी सूत जुळवल्याचा अविनाश याला राग आला. तो उत्तरप्रदेशातून नालासोपाऱ्यात आला पण ज्योतीने त्याचे घर सोडून दुसरीकडे घरोबा केला.

अविनाशकडे घराची चावी असल्याने तो तिथेच राहिला आणि त्याने ज्योती हिच्या नवीन घराचा पत्ता शोधून काढला. यानंतर रविवारी वेळ पाहून आरोपी ज्योतीच्या घरी गेला आणि तिची गळा आवळून ह’ त्या केली. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ज्योतीचा मृ’ त’ दे’ ह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी प्रियकरालाही ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस आरोपीची चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Team Marathi Tarka

Related articles