लग्नानंतर ही नातं घट्ट ठेवायचं असेल तर जाणून घ्या ‘ही’ ५ बेडरूम सिक्रेट्स!

लग्नानंतर ही नातं घट्ट ठेवायचं असेल तर जाणून घ्या ‘ही’ ५ बेडरूम सिक्रेट्स!

आपण एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आलो आणि त्या व्यक्तीशी लग्न केलं म्हणजे आपलं कर्तव्य संपतं असं नाही. उलट ते रिलेशनशिप आणि नातं सतत एव्हरग्रीन कसं राहील याकडे लक्ष देणे सुद्धा गरजेचे असते, जेव्हा त्यातील दोरी तुटते व एका काळाने त्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत आणि जसे आहे तसे नाते पुढे रेटले जाते तेव्हा त्या नात्याला अर्थ राहत नाही. खास करून तुम्ही विवाहित असाल तर मग अशावेळी इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपले नाते टिकवण्याचे महाकर्म पार पाडावे लागते.

विवाहित जोडप्यांना लग्नानंतर अधिक वेळ हा आपल्या बेडरूममध्येच मिळतो. दिवसभराच्या थकवणाऱ्या आयुष्यातून आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सोबत बसून स्वत:चा वेळ घालवण्याचे ते हक्काचे ठिकाण असते. पण हाच वेळ खराब झाला तर अजून समस्या नात्यामध्ये उद्भवू शकतात. त्या होऊ नयेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो आहोत काही बेडरूम सिक्रेट्स जे तुम्ही फॉलो केलेत तर तुमचे नाते अगदी टवटवीत राहील.

मोबाईलपासून अंतर ठेवा

मोबाईलने नात्यामधला संवाद मोठ्या प्रमाणावर संपवला आहे आणि ही गोष्ट नवरा बायकोच्या नात्याला सुद्धा लागू होते. जर तुम्हाला खरंच मनापासून आपल्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने वेळ घालवायचा असेल तर मोबाईल बाजूला ठेवा. सायलेंट करून ठेवला तर अति उत्तम म्हणजे तुमच्या मध्ये कोणताही अडथळा येणार नाही. अनेक निरीक्षणांतून हे दिसून आले आहे की जे कपल आपल्या एकांतात मोबाईलला मध्ये येऊन देत नाहीत ते अधिक सुखी आणि समाधानी राहतात आणि त्यांचे नाते अधिक निरोगी राहते.

ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवा

ऑफिस सोडल्यावर ऑफिसच्या गोष्टी तुम्ही तेथेच ठेवून आलात तर उत्तम! कारण अशा गोष्टी तुमचा मूड खराब करू शकता. जर चांगली गोष्ट असेल ज्यामुळे दोघांना आनंद होणार असेल तर साहजिकच ती या स्पेशल वेळी तुम्ही आपल्या जोडीदाराला सांगू शकता. पण जर काही वाईट घडले असेल आणि ते आपल्या जोडीदाराला कळवण्याइतके गरजेचे नसले तर ते सांगून तुमचा वेळ खराब करू नये. अनेकदा असे दिसून आले की ऑफिसच्या गोष्टींपासून सुरुवात होते आणि त्याबद्दल बोलता बोलताच सर्व वेळ निघून जातो.

झोपण्याआधी भांडणे मिटवा

संसार आला की त्यात भांडण हे आलेच. पण झोपण्याआधी प्रत्येक नवरा बायकोने भांडण मिटवले पाहिजे कारण जर ते वेळीच मिटवले गेले नाही आणि त्यात जर इगो आला तर अगदी छोटे भांडण सुद्धा मोठे व्हायला वेळ लागत नाही. अशा गोष्टींचा नात्यावर खूप परिणाम होतो. आधीच नात्याला खूप वर्ष झालेली असतात आणि अशा गोष्टी नात्यातला रस काढून टाकण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे मोठ्या मनाने चर्चा करून भांडणे मिटवावीत.

मुलांना दूर ठेवावे

ही गोष्ट सर्वच कपल्सना लागू होत नाही पण ज्यांना वाटते की आता मुले झाल्याने आपल्या जोडीदारासोबत आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही अशावेळी मुलांना जवळ घेऊन झोपू नये. अर्थात जर तुमचे घर मोठे असेल, मुलासाठी वेगळी खोली असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच केली पाहिजे. पाश्चिमात्य देशांमध्ये हीच गोष्ट डोळ्यापुढे ठेवून सहसा कपल्स आपल्या मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्र झोपण्याची सवय लावतात. यामुळे मुले झाल्यावरही एकमेकांना वेळ देता येतो आणि नाते उत्तम राहते.

रोमँटीक मुव्ही पाहणे

बेडरूम ही ती जागा असते जी कपल्ससाठी एक मिनी थियेटर सुद्धा असते. गरजेचा नाही की मोठा टीव्ही वगैरे असायला हवा. तुम्ही आपल्या लॅपटॉपचा सुद्धा वापर करू शकता आणि मस्त आपल्या जोडीदारासोबत रोमँटीक मुव्ही पाहत जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता. जाणकार सुद्धा सांगतात की महिन्यातून किमान एकदा तरी अश्याप्रकारे एकत्र आवडीचा चित्रपट पाहणे चांगले असते. यामुळे एकमेकांसोबत चांगला वेळाही जातो आणि मनावरचा थकवा सुद्धा कमी होतो. तर मंडळी ही आहेत काही बेडरूम सिक्रेट्स जी तुम्ही आवर्जून वापरली पाहिजेत आणि आपले नाते अगदी बहारदार ठेवले पाहिजे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Marathi Manoranjan

Related articles