Marathitarka.com

लग्नमंडपात पोहोचायच्या आधी नवरदेव पोहोचला रुग्णालयात,नवऱ्याने केले असे कांड..

लग्नमंडपात पोहोचायच्या आधी नवरदेव पोहोचला रुग्णालयात,नवऱ्याने केले असे कांड..

लग्नामध्ये आपल्याकडे वरात काढण्याची प्रथा ही पार्थ पूर्वीपासून आहे. अनेकदा वरात ही घोड्यावरच काढली जाते. मात्र, काही जणांना घोड्याची भीती वाटत असल्याने कारमध्ये देखील वरात काढण्यात येते. अनेकदा नवरदेव हे घोड्यावर बसण्यास नकार देतात. कारण की पाळीव प्राण्याचा काही भरोसा नाही. आता देखील एक अशीच घटना उघडकीस आली आहे.

याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना नेमकी कुठली आहे याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरत नाही. एका वरातीमध्ये नवरदेव हा घोडीवर बसल्याचे दिसत आहे, तर घोडीस्वार असलेला व्यक्ती हा आधी थोडा वेळ फिरवतो. त्यानंतर जो प्रकार घडलेला आहे, तो पाहून अनेकांना हसू आवरत नाही.

या नवरदेवाने घोडीला काहीतरी बाईक उडवेल असे स्टंट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घोडीने देखील बाईक उडतो त्याप्रमाणे समोरचे दोन्ही पाय वर केले आणि मग घोडीचे नियंत्रण सुटले आणि ती पाठमोरी पडली. मग नवरदेवाच्या अंगावर घोडी पडली. यामध्ये नवरदेवाला गंभीर दुखापत झाली. मात्र, इतरांना काही दुखापत झाली नाही.

त्यानंतर काही वेळातच नवरदेवाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. म्हणजे नवरदेवाचे लग्न हे बाजूलाच राहिले आणि त्याच्यावरच आता उपचार करण्याची वेळ आली. त्यामुळे या वरातीची चर्चा मोठ्या प्रमाणात सध्या होत आहे.

Team Marathi Tarka