लग्न झालेल्या बायकांची परपुरुषाबद्दल तसली भावना काय असते?जाणून घ्या…

स्रीचे लग्न झाल्यानंतर जर त्या नवराबायको मधे शारिरीक व मानसिक सुसंवाद असेल तर कुठलीही स्री ही आपला संसार,नवरा व मुलेबाळे यांतच रमते व परपुरूष कितीही देखणा,रुबाबदार,मनमिळावु असला तरी ती त्याचे कौतुक करेल पण त्याच्याबद्दल शारिरीक भावना कदापिही तिच्या मनात येणार नाही.कारण तिला स्वत:ला या गोष्टींमध्ये काहीही स्वारस्य नसते असे मला वाटते.
समाजाला घाबरुन संयम ठेवण्यापेक्षा तिचे मनच मुळात या गोष्टींना थारा देत नाही.पण ,पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.माझ्या ओळखीतलं एक उदाहरण द्यायचं झाल्यास ..तिला आपण मैत्रिण म्हणुया .आमचा बायकांच्या मैत्रीमधली ती एक मैत्रिण.ती एक गृहिणी,नवरा व दोन मुले,दोन मजली स्वत: चं घर,चारचाकी दारात व नवरा तर एवढा चांगला की भाजी आणणे व निवडणे,घरकामात जमेल तशी मदत करणारा .
ही मैत्रिण लग्नाआधी केवळ शाळा शिकलेली व माहेरची परिस्थिति चांगली आहे.तर तिने आपलं वजन कमी करण्यासाठी जिम लावली व त्यानंतर स्वत:च्या वयाच्या निम्म वय असणार्या मुलासोबत घरातुन निघुन गेली.जायच्या आधी मला फोन करुन दहा हजार पाहीजेत,एका मैत्रिणीची डिलीव्हरी आहे,तिचा नवरा आर्मी त आहे तर मदत पाहिजे म्हणाली.मी म्हटलं कुठला दवाखाना काय तर तिला काहीच नीट सांगता येईना.
मग मी नवर्याला विचारते म्हणुन फोन बंद केला.मला पण वाटायला लागलं की कधी नाही ते मदत मागतीये तर काय हरकत आहे पैसे द्यायला,मैत्रीची व्याख्या वगैरे आठवायला लागली मला.पण थोडा संशय पण येत होता म्हणुन मी आमच्या ग्रुपमधील दुसर्या मैत्रिणीला सांगितलं तर ती म्हणाली की तु मुळीच पैसेबिसे द्यायच्या भानगडीत पडु नको कारण दोघीतिघींना तिने पैसे मागितले आहेत व एकीकडुन घेतलेही आहेत.
जिममधे पण काहीतरी प्रकरण चालु आहे तिचे.मग मी तिला पैसे द्यायला जमत नाही म्हणुन सांगितले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी ती मैत्रिण जिम वाल्या मुलासोबत घरातले पैसे व दागिने घेऊन गेल्याचं समजलं.नंतर आठ दिवसांनी माहेरच्यांनी तिला शोधुन तिच्या घरी आणलं.विशेष म्हणजे पदरातल्या दोन मुलांकडे व आपल्या संसाराला वाचवण्यासाठी तिच्या नवर्याने तिला घरात घेतले.त्यामुळे असे वाटते की समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात.कुठलाही नितीमत्तेचा व भावनेचा नियम सरसकट सर्वांना लागु होईलच असे नाही.विनाशकाले विपरित बुद्धी पण होवु शकते.