आधी जावयाने केले सासूसोबत लग्न, हनिमूननंतर दोघांनी घेतला धक्कादायक निर्णय,ऐकून व्हाल थक्क…

आधी जावयाने केले सासूसोबत लग्न, हनिमूननंतर दोघांनी घेतला धक्कादायक निर्णय,ऐकून व्हाल थक्क…

पाटणा : बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यात एका आईने आपल्या मुलीचे घर उद्ध्वस्त करून आपल्या जावयासोबत लग्न केल्याचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. सून आणि सासूचे लग्न हनिमूनपर्यंतच टिकले आणि आता दोघेही घटस्फोटाची मागणी करत आहेत.

जावई आणि सासूला त्यांची चूक लक्षात आली मिळालेल्या माहितीनुसार, मारुही गावातील सूरज मेहता हा त्याची सासू आशा देवी हिच्या प्रेमात पडला होता. प्रेमात आंधळे झालेल्या दोघांनी गेल्या एक महिन्यापूर्वी लग्न केले.

आपल्या मुलीचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर महिनाभरातच आशादेवींना आपली चूक समजली.हे लग्न करून मोठी चूक केल्याचे दोघांचे म्हणणे आहे. आशा देवी आपल्या नवऱ्याकडे परत येऊ इच्छित आहे, तर सूरज आपल्या बायकोसोबत सेटल होण्यास तयार आहे.

काय प्रकरण होते : आपल्या मुलीचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सूरज आजारी पडला होता. आजारपणात सासूने जावयाची पूर्ण काळजी घेतली. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या जवळ आले. सूरज बरा होताच ती घरी परतली, पण त्यांचे प्रेम वाढत गेले.

त्यांची प्रेमकथा पूर्ण करण्यासाठी दोघांनी लग्न केले. या नात्याची बातमी समजताच आशाची मुलगी आणि सूरजची बायको बेशुद्ध पडली. आईच्या या कृत्याने हादरलेली सूरजची पहिली बायको आजही वडिलांसोबत राहत आहे.

Team Marathi Tarka

Related articles