गर्भवती राहण्यासाठी ‘या’ दिवसात संबंध ठेवणं महत्वाचे ! घ्या जाणून…

आई होणं ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट असते. अनेकांना यासाठी मोठी प्लानिंग करावी लागते. तर काही महिलांना अचानक समजतं की त्या प्रेग्नंट आहेत.खरं तर महिलांच्या शरीरात एक नवीन जीव जन्माला येणं, ही एक जटिल प्रक्रिया आहे आणि ती अनेक टप्यात घडते.
अनेकदा महिलांना विना प्रोटेक्शन संबंध ठेवल्यामुळे आपण आता प्रेग्नंट होणार, असं वाटतं. मात्र जेव्हा असं घडत नाही. तेव्हा महिला तणावाखाली येतात.बाळ होण्यासाठी जोडप्यांनी शरीरसंबंध नेमके कधी ठेवावेत? महिन्यातील कुठले दिवस योग्य असतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
ओव्यूलेशनच्या दिवसात महिला सहज आणि लवकर प्रेग्नंट होऊ शकतात. महिलांच्या अंडाशयातून अंडी बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला ओव्यूलेशन म्हणतात.प्रत्येक महिन्यात मासिक पाळीच्या दोन आठवडे आधीचा हा काळ असतो. या काळाला फर्टिलिटी विंडो देखील म्हटलं जातं.
ही अशी वेळ असते ज्या काळात महिलांच शरीर सर्वाधिक फर्टाइल असतं. या काळात शरीरसंबंध ठेवल्यास महिलांना सहज गर्भधारणा होऊ शकते.12 ते 24 तास महत्वाचे ओव्यूलेशनच्या दिवसात तुम्ही प्रोटेक्शन शिवाय शरीरसंबंध ठेवल्यास स्पर्मची एगला फर्टिलाइज करण्याची प्रक्रिया जलद गतीने होते
ओव्यूलेशनच्या दिवसात महिलांच्या अंडाशयातील अंडी 12 ते 24 तास फर्टिलायजेशन सक्षम असतात.स्पर्म तीन ते पाच दिवस महिलांच्या शरीरात जिवंत राहतात. त्यामुळे तुम्ही जर बाळाचा विचार करत असाल, तर हा काळ चांगला आहे.