‘या’ राशींची मुलं असतात फ्लर्टिंगमध्ये एक्स्पर्ट; तुमचा बॉयफ्रेंड तर तसा नाही ना?

‘या’ राशींची मुलं असतात फ्लर्टिंगमध्ये एक्स्पर्ट; तुमचा बॉयफ्रेंड तर तसा नाही ना?

काही मुलं अशी असतात, ज्यांचा प्रेमावर जास्त विश्वास नसतो. परंतु, फ्लर्ट करण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यांच्यासाठी फ्लर्ट करणं एक कला असते. आता यांच्या फ्लर्टिंग करण्याची मर्यादा कोणती, हे पूर्णतः परिस्थितीवर अवलंबून असतं. असं सांगितलं जातं की, अशी मुलं आपल्या पार्टनरसमोरही दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाहीत.

यांच्या याच सवयीमुळे अनेकदा त्यांच्या नात्यामध्ये दुरावाही येतो. पण तरिही यांच्यावर मात्र काहीही परिणाम होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशीच्या मुलांबाबत सांगणार आहोत. जे कधीही फ्लर्ट करू शकतात. जर तुमचाही पार्टनर यापैकी एखाद्या राशीचा असेल, तर जरा सांभाळूनच राहा.

मिथून राशी – मिथून राशीच्या व्यक्ती फार सोशल असतात, कारण यांना लोकांसोबत स्वतःहून बोलायला फार आवडतं. असं म्हटलं जातं की, पहिल्याच भेट या व्यक्ती आपल्या दिलखुलास बोलण्यामुळे स्वतःकडे लोकांना आकर्षित करून घेतात. यामुळेच मुली यांच्याकडे लगेच आकर्षित होतात. पण त्यांना अजिबात माहिती नसतं की, फ्लर्ट करणं यांच्या सवयीचाच भाग आहे.

तूळ राशी – असं म्हटलं जातं की, तूळ राशीची मुलं फार चार्मिंग असतात. यांची बोलण्याची पद्धतही अत्यंत वेगळी असते. यामुळेच मुली यांच्याकडे लगेच आकर्षित होतात. स्वभावाने रोमॅन्टिक असणारी या राशीची मुलं फार चलाखीने फ्लर्ट करतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला अजिबात समजत नाही की, हे खरं प्रेम करत आहेत की फक्त फ्लर्ट करत आहेत.

सिंह राशी – सिंह राशीच्या मुलं अधिक आकर्षक असतात. लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं यांना फार उत्तम जमतं. यांच्या याच गुणांमुळेच या प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान तयार करतात. एवढचं नाहीतर या व्यक्ती फ्लर्टही अगदी परफेक्शनसोबतच करतात. परंतु, समोरची व्यक्ती जेव्हा यांच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत असेल तरच ही मुलं फ्लर्ट करतात.

वृश्चिक राशी – असं म्हटलं जातं की, या राशीच्या मुलांचा फ्लर्ट करण्याचा अंदाज फार वेगळा असतो. या व्यक्ती पहिल्या भेटीतच लोकांसोबत कन्फर्टेबल होतात. त्यानंतर ही मुलं हसत खेळत फ्लर्ट करायला सुरुवात करतात. पण ही मुलं तेव्हाच असं करतात, जेव्हा यांना समोरच्या व्यक्तींमध्ये इंटरेस्ट असतो. यांच्याबाबतची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या व्यक्ती एखाद्या पर्सनल व्यक्तीलाच आपला मौल्यवान वेळे देणं पसंत करतात.

मेष राशी – मेष राशीची मुलं स्वाभावेन फार हट्टी, आयडिअल, रागिट असतात. परंतु, हे फ्लर्ट करण्यातही तेवढेचं माहिर असतात. असं म्हणतात, जर यांना कोणी आवडलचं तर त्या व्यक्तीला आपल्या मानातील गोष्ट सांगण्याची सुरुवात हे फ्लर्ट करण्यापासून करतात.

पण जर यांना दिसून आलं की, आपल्या जे मनात आहे, तेच समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, तर मात्र हे थेट आपल्या मनातील गोष्ट सांगून मोकळे होतात. जर यांना समोरच्या व्यक्तीमध्ये काहीही इंटरेस्ट नसेल तर हे त्यांच्याकडे फारसं लक्षं देत नाहीत.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

Team Marathi Manoranjan

Related articles