Marathitarka.com

पहिल्या भेटीतच मुले अशा मुलींना देतात नकार ! कारणे घ्या जाणून…

पहिल्या भेटीतच मुले अशा मुलींना देतात नकार ! कारणे घ्या जाणून…

मुलांना स्वतःकडे आकर्षित करण्याच्या नादात बहुतेक वेळा मुलीचा पहिल्या भेटीत गोंधळ होतो. म्हणूनच, भेटायला जाण्यापूर्वी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.बहुतेक मुलींचा असा विचार आहे की टीव्ही आणि चित्रपटांमध्ये ते ज्या प्रकारे दर्शविले जातात. तशाच प्रकारे मुलांनाही खरोखर जीवनातही तश्या मुली आवडतात.

परंतु त्याउलट, त्यांना वास्तविक जीवनात फक्त गंभीर मुली आवडतात.यामुळे बर्‍याच वेळा मुली मुलांना स्वतःकडे आकर्षित करण्याच्या नादात स्वतः गोंधळ करून बसतात. तर मग जाणून घेऊया महिलांनी पहिल्या भेटीला अजिबात करू नये.

जास्त नाटक करणाऱ्या : ज्या मुली जास्त नाटक करत असतात त्या पुरुषांना बिलकुल आवडत नाहीत. वास्तविक, ज्या मुली लहान मुलासारखं वागतात आशा मुलींना मुले अधिक पसंत करतात असे मुलींना वाटते पण खर तर असं काही नसतं.

शांत राहणाऱ्या : अशा बर्‍याच मुली आहेत ज्यांना असे वाटते की शांत असलेल्या मुली मुलांना जास्त आवडत असतात. तथापि, मुलींचे हे समजणे पूर्णपणे चुकीचे आहे. खरं तर मुलांना शांत मुली आवडत नाहीत पण त्यांना समजूतदारपणाने बोलणाऱ्या मुली जास्त आवडतात. आपण आपल्या पहिल्या भेटीला गप्प राहिला तर ते आपली पहिली छाप खराब होते.

जास्त मेकअप करणाऱ्या : बहुतेक मुली बराच मेकअप करताना दिसतात. पण मुलांना जास्त मेकअप करणाऱ्या मुली आवडत नाही कारण त्यांना साध्या राहणाऱ्या मुली जास्त आवडतात.

तोकडा ड्रेस : बर्‍याच मुलींना असे वाटते की छोटे कपडे घालणाऱ्या मुलीं मुलांना जास्त आवडतात. पण असे मुळीच नाही. मुलांना मुलगी साधी सरळ स्वच्छ आणि स्वत: ची काळजी घेणारी आवडते.

नकार देणाऱ्या : मुलींचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे सर्व गोष्टी नाकारल्यास मुलांना अधिक आवडेल. परंतु त्याउलट, मुलांना अशा मुली आवडतात जे त्यांना न आवडलेल्या गोष्टी स्पष्टपणे बोलतात.

Team Marathi Tarka