दोन प्रियकर एकाच प्रेयसीसाठी भिडले अन नंतर मग झाले असे सुरू…

एका प्रियकराशी ब्रेकअप करून दुसऱ्या प्रियकराशी संबंध जोडल्याच्या रागातून ह-त्-या झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आदित्य असं मृ-त तरुणाचं नाव आहे तर ललित असं मुख्य संशयित आरोपीचं नाव असून या प्रकरणात ललितसह अन्य तिघांचाही समावेश आहे.यात ललितला शनिवारी ताब्यात घेण्यात आलं आहे,तर अन्य तिघांना रविवारी ताब्यात घेण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं? : याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, किरण ही तिच्या भावासोबत दिव्यात राहते. तर तिची आई खडेगोळवली परिसरात राहते. ललित उज्जैनकरही खडेगोळवली परिसरातच राहतो. किरण आणि ललितमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता.त्यानंतर किरणने आदित्यशी मैत्री केली होती.
त्यामुळे ललितचा आदित्यवर राग होता.दरम्यान, किरणच्या भावाचा एक कुत्रा आहे, हा कुत्रा ललितकडे होता. हाच कुत्रा नेण्यासाठी शनिवारी रात्री किरण आदित्यसोबत खडेगोळवली परिसरात ललितकडे आली होती. यावेळी तिघांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या ललितने काही साथीदारांच्या मदतीने आदित्यला मा-र-हा-ण केली, चा-कू-ने ह-ल्-ला केला.या ह-ल्-ल्-यात आदित्यच्या जागीच मृ-त्-यू झाला.
या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गु-न्-हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर फरार ललित आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली. दरम्यान, एकाच दिवसात दोन प्रेम प्रकरणांचा अशा पद्धतीने झालेला अंत वाचून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.