Marathitarka.com

डॉक्टर मुली एवढ्या सुंदर का असतात?जाणून घ्या…

डॉक्टर मुली एवढ्या सुंदर का असतात?जाणून घ्या…

स्त्री डॉक्टरांची तऱ्हाच निराळी असते.आठ दहा वर्षांची मिळालेली पुस्तकी पोषकमूल्ये, आकृत्या आणि लिखाण करून करून डोळ्यात भरून ओसंडलेली डोळ्याखालची काळजीची काजळी आणि त्यामुळे झालेला निसर्गदत्त आय मेकप, पाचव्या मजल्यावर पथोलॉजी ते तळमजल्यावर अनाटोमी करता करता काटक झालेले पाय, हाती नेआण करून दहा पंधरा किलो वजनी पुस्तकांनी बांधेसूद झालेले खांदे आणि डोक्यावर असलेल्या केसांना मिळालेली उनपावसाची साथ ह्यामुळे तिला वेगळंच सौंदर्य लाभलेलं असतं.

त्यात कुणी तिला भाव दिला तर तिला त्या मानवी शरीरातील अवयव, स्नायू आणि हाडे ह्या मागचे शास्त्र अवगत असल्याने दंडावरचां असो का कंबरेखालचा, कुठलाही “प्रसरण पावणारा स्नायू” किंवा “त्याचे प्रसरण झाल्यानंतरचे आकारमान” आणि बळ तिला प्रभावित करू शकत नाही उलट त्यांकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन वैज्ञानिक आणि चिकित्सकच असतो.

शेवटी मात्र प्रयोगशाळेत बरणीत भरलेला पाहिलेला डोक्यातला गाठी असेलला स्नायूच तिच्या पसंतीस उतरतो. ती त्याचे जीवित प्रमाण इथे तिथे शोधत असते. ज्या पुरुषात तो स्नायू बळकट आणि निरोगी तिथे तिची पसंती असते. अर्थातच अशा बळकट मस्तिष्कवान पुरुषाला सुद्धा ती स्त्री डॉक्टर तिचे अथक प्रयत्न, चिंतन, मनन आणि अभ्यास करून घडलेल्या तिच्या नम्रबुद्धीने सौंदर्यवती झालेली जाणवत असतेच.

म्हणतात ना की डोक्याला डोकेच पसंत पडते.शेवटी एकच म्हणेन की डॉक्टर मुलीचे मतीसौंदर्य मुळात तिचा आत्मविश्वास, परिश्रम आणि एवढ्या वर्षांचा मानवी अनुभव ह्यामुळे खुललेले असते आणि त्यामुळेच डॉक्टर मुली सुंदर दिसतात.

Team Marathi Tarka