डान्सरसरचे तसले हावभाव पाहून तरुणाला नाही निघाला दम,स्टेजवरच सगळ्यांसमोर केले असे कांड…

सोशल मीडियावर डान्सशी संबंधित अनेक व्हिडिओ दररोज अपलोड होत असतात. या व्हिडिओना जोरदार प्रतिसादही मिळतो. त्यातील काही व्हिडिओ हे अत्यंत सुंदर डान्सचे असतात तर काही व्हिडिओ मजेशीर असतात. विनोदी पद्धतीने केलेला डान्स किंवा डान्स करताना घडलेली विनोदी घटना दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात.
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतात लग्न आणि नृत्य यांचा जवळचा संबंध आहे. वधू आणि वरासोबतच लग्नघरातील तमाम मंडळी नृत्याचा आनंद घेत असतात. हळदीपासून वरातीपर्यंत वेगवेगळ्या निमित्ताने लोक डान्स करण्याचा आनंद घेतात आणि संगीताच्या तालावर ठेका धरतात. आपल्या मनातील आनंद व्यक्त करण्यासाठी डान्स हे एक उत्तम माध्यम मानले जाते.
डान्स करण्यासाठी अनेकदा प्रोफेशनल डान्सरला देखील बोलावले जाते. अशाच एका प्रोफेशनल डान्सरच्या नृत्याने उत्साह येऊन स्वतः डान्स करू लागलेल्या व्यक्तीची कशी फजिती झाली, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या छोट्याशा व्हिडिओत सुरुवातीला एक महिला डान्सर संगीताच्या तालावर ठेका धरताना दिसते.
तिच्यासोबत एक पुरुष उभा आहे आणि तो देखील नाचण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला महिला डान्सरच्या नृत्याकडे तो बारकाईने पाहत असतो. डान्स करण्यात आली तिची नजाकत आणि तिची अदा पाहून आपणही डान्स करावा, असे त्याला वाटतं. कशाबशा उभारलेल्या त्या स्टेजवर तो स्वतः डान्स करायला सुरुवात करतो. मात्र त्याने डान्स करायला सुरुवात केल्या केल्या असं काही घडतं की सगळ्यांची हसून हसून पुरेवाट होत
महिला डान्सरसोबत उभी असलेली व्यक्ती जेव्हा डान्स करायला सुरुवात करते, तेव्हा एक विनोदी पण तितकीच गंभीर घटना घडते. डान्स करणाऱ्या त्या व्यक्तीच्या वजनाने थेट स्टेज कोसळतं. डान्स करता करता ही व्यक्ती स्टेजवरून थेट खाली कोसळते. स्टेजची उंची फार नसल्यामुळे या व्यक्तीला कुठलीही गंभीर दुखापत होत नाही. मात्र ज्या प्रकारे ही व्यक्ती स्टेजवरून खाली कोसळते आणि स्टेज मोडते ते पाहून सर्वांनाच हसू कोसळते.