Marathitarka.com

ब्लाऊज आहे खूप टाईट शिलाई न उसवता करा अशी परफेक्ट फिटिंग,जाणून घ्या…

ब्लाऊज आहे खूप टाईट शिलाई न उसवता करा अशी परफेक्ट फिटिंग,जाणून घ्या…

साडीवरील ब्लाऊजचे फिटिंग जितके परफेक्ट असेल साडी नेसायला देखील तितकीच सुंदर दिसते. ब्लाऊजचे माप, फिटिंग अगदी आपल्याला फिट होत असेल किंवा आपल्या मनासारखे झाले असेल तरच ब्लाऊज छान दिसतो.याउलट ब्लाऊज लूज, ढगळा किंवा परफेक्ट शिवला नसेल तर तो आपल्या अंगावर फिट बसत नाही आणि दिसतानाही विचित्र दिसते.

बायका साडीवरचे ब्लाऊज शिवायला टेलरला देताना 100 वेळा त्याला व्यवस्थित फिटिंगचा आणि मापाचा शिवण्याची ताकीद देतात. आजकाल बाजारात रेडिमेड ब्लाऊजदेखील खूप सुंदर डिझाईनचे मिळतात.आपण शिवून घेतलेला किंवा रेडिमेड बाजारातून तयार असलेला ब्लाऊज आपल्याला कधी ढगळा किंवा लहान होऊ शकतो.

एखाद्यावेळी आपला जुना ब्लाऊज आपण खूप वर्षांनी कपाटातून काढतो आणि आपण जाड झाल्यामुळे काहीवेळा आपला सगळ्यात आवडता ब्लाऊज आपल्याला होत नाही.अशावेळी आपल्याला ती आवडती साडी नेसायची असते पण ब्लाऊज होत नसल्यामुळे ती नेसणं आपण टाळतो. पण आता चिंता करू नका ब्लाऊजची शिलाई न उसवता आपण आपल्या ब्लाऊजची साईझ बदलू शकतो.

आपला आवडता ब्लाऊज होत नसेल तर आपण ब्लाऊजच्या आतील एक्स्ट्रा शिलाई सोडून त्याची साईझ वाढवतो. परंतु असे वारंवार केल्यास शिलाई उसवण्यात ब्लाऊजची फिटिंग बिघडते. तसेच शिलाई काढल्यामुळे तेथील कापड खराब होऊन फाटण्याची शक्यता असते. अशावेळी आपण एक सोपा उपाय करून ब्लाऊजची साईज बदलू शकतो.

Team Marathi Tarka