भावाने केले सख्ख्या बहिणीशी लग्न, कारण ऐकून व्हाल थक्क…

एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना योजनेतून पैसे मिळविण्यासाठी सामूहिक विवाह कार्यक्रमात स्वतःच्या बहिणीशी लग्न केले. समाजकल्याण विभागाकडून हा विवाह सोहळा आयोजित केला जातो.
सामूहिक विवाह योजनेंतर्गत राज्य सरकार प्रत्येक जोडप्याला 35000 रुपये आणि त्यांना भेटवस्तूही देते. योजनेनुसार वधूच्या बँक खात्यात 20,000 रुपये जमा केले जातात आणि 10,000 रुपयांच्या भेटवस्तू देखील दिल्या जातात.
फिरोजाबादमधील तुंडला येथे 11 डिसेंबरला हा विवाह सोहळा झाला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी जोडप्यातील दोघांना ओळखले आणि ते भाऊ आणि बहीण असल्याचे उघडकीस आले. तुंडला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये इतर 51 जोडप्यांचेही लग्न झाले होते.
तुंडलाचे ब्लॉक विकास अधिकारी नरेश कुमार यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. संबंधितांवर कारवाई केली जाईल. सध्या त्यांच्या आधार कार्डची पडताळणी केली जात आहे. त्या भावाविरुद्धही एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे नरेश कुमार यांनी सांगितले.