बायकोने प्रियकरासोबत मिळून नवऱ्यासोबत रात्री केले असे भयानक कांड,ऐकून उडेल थरकाप…

बायकोने प्रियकरासोबत मिळून नवऱ्यासोबत रात्री केले असे भयानक कांड,ऐकून उडेल थरकाप…

कविता नावाची एक महिला आणि तिचा प्रियकर हितेश जैन या दोघांना पोलिसांनी कमलकांत शाह याच्या ह-त्-येच्या आरोपात अटक केली आहे. कविता ही कमलकांत शाहची पत्नी आहे. कविता आपल्या पतीला जेवणातून रोज थोडं थोडं विष देत होती.

आर्सेनिक आणि थेलियम ती त्याच्या जेवणात मिसळत होती. त्यामुळे 17 दिवसांनी तिच्या पतीचा म्हणजेच कमलकांतचा मृत्यू झाला. कमलकांतला 3 सप्टेंबर 2022 ला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.कमलकांत ज्या रूग्णालयात दाखल होता ते रूग्णालय होतं बॉम्बे हॉस्पिटल.

या ठिकाणी कमलकांत शाह नावाच्या व्यक्तीला 3 सप्टेंबरला आणलं गेलं. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 9 ने कविता नावाच्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या महिलेवर आरोप आहे की तिने 45 वर्षीय कमलकांत शाहला मा-र-लं.

या दोघांना सध्या 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत धाडण्यात आलं आहे.3 सप्टेंबरला 2022 ला कमलकांतला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 19 सप्टेंबर पर्यंत तो उपचार घेत होता. मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. कमलकांतचा मृत्यू ज्या प्रकारे झाला ते डॉक्टरांनाच कुठेतही पटलं नाही.

त्यामुळे डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच कमलकांतच्या रक्ताची हेवी मेटल टेस्ट केली. त्याचा जो अहवाल समोर आला त्यामुळे डॉक्टरांचा संशय आणखी गहिरा झाला. कारण रिपोर्टनुसार कमलकांतच्या शरीरात आर्सेनिक आणि थेलियम धातू या दोन्हीचं प्रमाण वाढलं होतं.

कोणत्याही माणसाच्या शरीरात धातूचं प्रमाण वाढणं ही बाब सामान्य नसते. त्यामुळे डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ही केस सांताक्रुझ पोलिसांकडे वर्ग केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.

Team Marathi Tarka

Related articles