Marathitarka.com

बायकोला जवळ येऊ देत नसायचा नवरा,सत्य समजताच बायको गेली हादरून…

बायकोला जवळ येऊ देत नसायचा नवरा,सत्य समजताच बायको गेली हादरून…

बायकोपासून सतत दूर राहणाऱ्या नवऱ्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर आल्यानं बायकोने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. तरुणी एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असून नवरा एका प्रतिष्ठीत बँकेत चांगल्या पदावर काम करत आहे.

नवऱ्याचा मोबाईल तपासल्यानंतर बायकोला काही धक्कादायक गोष्टी आढळून आले. त्याच्या स्मार्टफोनमधील ऍप्स पाहून तिला धक्काच बसला. यानंतर बायकोने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

बंगळुरूतील एका प्रख्यात कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या शालिनीचा जून 2018 मध्ये एका आघाडीच्या खासगी बँकेत कार्यरत असलेल्या विक्रमशी विवाह झाला. घरातील वरिष्ठांनी हा विवाह करून दिला. 31 वर्षांच्या विक्रमचं हे दुसरं लग्न होतं.

लग्नानंतर दोघे जयानगरमध्ये राहू लागले. सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं पाहत सासरी आलेल्या शालिनीला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. पहिल्या बायकोनं फसवणूक केल्याचं म्हणत त्याच गोष्टींचा विचार करत विक्रम खिन्न व्हायचा.

पहिल्या पत्नीनं दिलेल्या धक्क्यातून सावरत असल्याचं कारण देत सुरुवातीला तो शालिनीपासून दूर राहिला. त्यानंतर त्यानं लग्नात हुंडा कमी मिळाल्याचं म्हणत नवा वाद सुरू केला. विक्रमनं काहीवेळा शालिनीवर आ’:- रो’:- प केले.

लॉकडाऊन सुरू झाल्यानं सोबत वेळ घालवून वाद सोडवता येईल असा विचार शालिनीनं केला. मात्र लॉकडाऊनमध्ये घडलेल्या घटनांनी ती आणखी हादरली. गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाला. त्यावेळी विक्रम सातत्यानं स्मार्टफोनला चिकटलेला असायचा.

तो काही गे डेटिंग ऍप्सचा वापर करत असल्याचं शालिनीच्या लक्षात आलं. विक्रमने ऍप्सवर प्रोफाईल तयार केल्याचं शालिनीनं पाहिलं. विक्रमनं काही व्यक्तींसोबत केलेले चॅट्सदेखील तिने बघितले. विक्रम लग्नानंतर लांब लांब का राहत होता याचं उत्तर शालिनीला त्या चॅट्समधून मिळालं. त्यानंतर तिनं घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Team Marathi Tarka

Related articles