बायको पडली दुसऱ्याच्या प्रेमात,नवऱ्याने केले असे ऐकून बसेल धक्का…

बायको पडली दुसऱ्याच्या प्रेमात,नवऱ्याने केले असे ऐकून बसेल धक्का…

मध्य प्रदेशच्या भिंडमधून एक फारच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एक पत्नी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि आपली पत्नी परत मिळवून द्या अशी पोलिसांकडे मागणी करू लागला.

पत्नीने घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं आणि पहिल्या पतीकडून दर महिन्याचा खर्च घेत राहिली. ती दुसऱ्या पतीसोबत राहत होती. महिला म्हणाली की, तिला तिचा पहिला पती पसंत नाही म्हणून तिने दुसरं लग्न केलं.

घटस्फोट न घेता महिलेने केलं दुसरं लग्न : ही घटना भिंडच्या मेहगांव भागातील आहे. मेहगांवातील रहिवाशी धर्मेंद्र जावटवचं चार वर्षाआधी 4 मार्च 2017 मध्ये राखी नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर राखी आणि धर्मेंद्र घटस्फोट न घेताच वेगळे झाले.

यादरम्यान धर्मंद्र आपल्या पत्नीला महिन्याचा खर्चही देत होता. पण अचानक धर्मेंद्रला समजलं की, त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं. इतकंच नाही तर त्याची पत्नी दुसऱ्या पतीपासून गर्भवतीही राहिली.

पहिला पती मदतीसाठी पोलिसांकडे : पत्नीच्या लग्नाची माहिती मिळताच धर्मेंद्र भिंड डीएसपी पूनम थापाकडे गेला आणि आपल्याला आपली पत्नी परत मिळवून देण्याची मागणी करू लागला. डीएसपी पूनम थापाने धर्मेंद्रची पत्नी आणि तिच्या दुसऱ्या पतीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं.

राखी तिच्या पहिल्या पतीसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. तर तिच्या दुसऱ्या पतीने सांगितलं की, त्याला पत्नीच्या पहिल्या लग्नाबाबत काहीच माहीत नव्हतं.

महिलेने पतीसोबत जाण्यास दिला नकार : राखीने दुसरं लग्न मंदिरासोबत कोर्टातही केलं आहे. तिचा पहिला पती धर्मेंद्र म्हणाला की, त्याला त्याची पत्नी परत हवी आहे. त्याने तिला महिन्याचा खर्चही दिला आहे. पण त्याला कळालंच नाही की, तिने दुसरं लग्न कधी केलं.

धर्मेंद्र म्हणाला की, घटस्फोट घेतला नाही तर दुसरं लग्न कसं होऊ शकतं. पोलीस म्हणाले की, चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

Team Marathi Tarka

Related articles