बायकांचं चाळीशीमध्ये आयुष्य कसे असते? घ्या जाणून…

जे नेहमी एक समजूत असते की चाळिशी म्हणजे खूप बोरिंग आणि उदासीनता असं आयुष्य होणार आहे , तर एवढं काही नसतं.इतकं असतं की आता आपण तरुण राहिलो नाही याची जाणीव होते आणि सिनियर सिटिझन ही पदवीसाठी थोडा वेळ आहे याचा एक समाधान असतो.
तसं पाहिलं तर 40 ते 41 वयात असं काही जास्त बदल जाणवत नाही पण जस तुम्ही 42 पार करतात तेव्हा जरा फरक जाणवतो.सुरकृती चेहऱ्यावर आकृती बनवत असते , काळया केसांना आता पांढऱ्या केसांचा साथ मिळाली असते , नजरेतील तीव्रता कमी होऊ लागते तर मग दोन डोळ्यांचे चार डोळे होऊन जातात , वजन वाढतो आणि जरा आळशीपणा ही वाढतो.
स्त्रियांन मध्ये मेनोपॉचे लक्षणे दिसायला लागतात , हॉर्मोनाल बदलाव होतात हे सर्व जरी नैसर्गिक असल्या तरीहि त्यांचा जरा त्रास, मात्र असतोस.चाळीशी म्हणजे तुम्ही तुमच्या करियर आणि कौटुंबिक जीवनात बऱ्यापैकी सेटल झालेले असतात म्हणजे आता आपण थोडेफार निर्धास्त आणि बिनधास्त होतो . स्वतः कडे लक्ष देण्यासाठी आता आपल्याला वेळ असतो .
या वयातअध्ये जे मट्युरिटी येते ते संतुलित असतं . आपल्या आयुष्यात आपण आता थोडे सरीयस आणि संयमी होता . हे वय म्हणजे मुळांचे शिक्षण , करीयर आणि आपले रिटायरमेंट प्लॅन्स करत राहणे , हे पण एक वेगळाच अनुभव असतो. आपण काही नवीन गोष्टी शिकतो आणि जून्या आठवणी साठवून ठेवतो.
तर मी आता 45 आहे आणि चाळीशी मध्ये पदार्पण होताना मला ही भीती होती की आता काय होणार माझं.?खरं सांगायचं तर चाळीशी हे बरचं आहे..माझा म्हणाल तर ,मला आता नवीन भाषा, फ्रेंच किंव्हा स्पॅनिश शिकायचं आहे…एक नवीन विषय मध्ये मास्टर्स ,करायचं आहे , सोलो ट्रिपला जायचे आहे, भरपूर शॉपिंग करायची आहे आणि आपल्या चाळीशी मध्येही आपलं बालिशपणा जपायचे आहे.