बाईच्या लफड्यात का पडू नये? घ्या जाणून…

बाईच्या लफड्यात का पडू नये? घ्या जाणून…

स्वतःच्या बाबतीत असल्या काही उचापती करु नये आणि दुसऱ्याच्या बाबतीत चुकून सुद्धा पडू नये. एक तर या गोष्टीचे पु‌रावे फारसे नसतात आणि अंगलट यायला लागले कि मुली स्वतःला वाचवण्यासाठी आपला बळी द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. मी दुसऱ्यांची प्रकरणं निस्तरताना खुप अनुभव घेतलेत.मी त्यामध्ये भाग घेताना सर्व परिस्थिती आपल्या हातात आल्यानंतर घेत होतो.

त्यावेळी बऱ्याच जणींना माझा राग आला होता परंतु नंतर जवळपास सर्वच जणींनी आभार मानले काही जणींनी त्या प्रकाराबद्दल माफी सुध्दा मागितली.त्यातुन माझ्या लहान भावाच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगतो. गावामध्ये वडिलांच्या मित्रांशी आमचे घरच्या सारखे संबंध होते काही ना काही कारणाने जवळपास रोजच जाणे येणे होत होते.

त्यांचे घर गावाच्या शेवटी शेतांना लागून आमच्या शेतात जाण्याच्या रस्त्यावरच होते तसेच त्यांच्या घरा शेजारी आमच्या शेतात काम करणारे एक शेतमजूर कुटुंब रहात होते त्यामुळे शेतात जाताना किंवा येताना त्यांच्याकडे जाणे होत असे. त्यांच्या चुलत भावाच्या मुलीचे गावातील एका मुलांसोबत असलेले अफेअर लहान भावाला समजले.

तो त्याबाबत माझ्याशी बोलला तेंव्हा त्याला मला हे खुप दिवसांपासुन माहीत आहे तु याकडे दुर्लक्ष कर असे सांगितले तेंव्हा त्याने त्या मुलाला दारु सिगारेट गुटखा अशी व्यसने असून हे थांबवले नाही तर पुढे त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना फार त्रास होईल असे सांगितले. तेंव्हा मी त्याला आपले मित्र फक्त या घरात आहेत त्या कुटुंबा शिवाय कोणाशीही आपले काहीच देणेघेणे नाही तेंव्हा तु याकडे लक्ष देऊ नकोस.

त्या नंतर त्याने दुर्लक्ष केले परंतु एक दिवस भाऊ लघुशंकेसाठी उसाच्या शेतात गेल्यावर ति मुलगी त्या मुलांसोबत नको त्या अवस्थेत त्याला दिसली तेंव्हा शेतात न जाता माझा भाऊ परत मित्राच्या घराकडे निघाला. तो मुलगा पळून गेला व कपडे ठिकठाक करून ति मुलगी सुध्दा त्याच घरात आली आणि भावाला कोणाला काहीही सांगू नकोस असे म्हणाली.

तेंव्हा त्याने हे तुला शोभते का असे विचारत हे आज पासून बंद व्हायला हवे नाहीतर तुझ्या घरच्यांशी मला बोलावे लागेल असे म्हणाला. त्यानंतर मुलीने घाबरून स्वतःला वाचवण्यासाठी कांगावा करत माझा भाऊ वाईट नजरेने तिच्याकडे पहातो आणी आज दुपारी काकांच्या घरी टिव्ही पहायला गेल्यावर माझ्याशी असभ्य भाषेत बोलायचा प्रयत्न केला.

सायंकाळी तिचे वडील अम्ही ज्यांच्याकडे जायचो त्यांच्या घरी आले आणी त्यांनी त्यांच्याकडे याबाबत तक्रार करत त्याला बोलावून घ्या अपण त्याला जाब विचारू असे सांगितले.त्यांच्या घरी या विषयावर चर्चा सुरु होती. त्यांनी आमच्या घरी अम्हा दोघांना बोलवायला निरोप पाठवला. निरोप देणारी व्यक्ती रस्त्यातच मला भेटली त्याच्याकडून तिथे जे काही चालले आहे त्या बाबतचा वृत्तांत समजला.

मी आणि निरोप घेऊन आलेली व्यक्ती असे दोघे त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली.तरीही त्या मुलीच्या वडिलांचा आमच्या वरचा राग तसाच राहिला.त्यांनी भावाला म्हणजेच वडिलांच्या मित्राला आमच्याशी संबंध तोडण्याची ताकीद दिली. मी वडिलांच्या मित्राला तिच्या प्रकरणाची कल्पना दिली आणि यातूनच काही तरी झाले असावे असा विश्वास देऊन तेथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी भावाशी चर्चा केल्यानंतर तो वृतांत वडिलांच्या मित्राला सांगितला.

Team Marathi Tarka