अनैतिक संबंध का निर्माण होतात? जाणून घ्या…

अनैतिक संबंध का निर्माण होतात? जाणून घ्या…

1) नैसर्गिकरित्या आपण कित्तीही नाही-नाही म्हटलं तरी स्त्री-पुरुष यामध्ये प्रचंड आकर्षण असते। आणि हीच गोष्ट या सर्वांचा कारणीभूत आहे.आपण कित्तीही परिपक्वतेच्या गोष्टी केल्या तरी 100% परिपक्व स्त्री किंवा पुरुष मला तरी अजून भेटलेले नाहीत.

2) प्रसार माध्यमातून किंवा इतर माध्यमातून या गोष्टींचा प्रसार आणि प्रचार खूप अतिजलद गतीने होत आहे त्यामुळे लोकांना खास करून तरुण मुलांना या गोष्टी खूप सामान्य वाटत आहेत.

3) घरातील किंवा आजूबाजूला या गोष्टी सरहास आणि राजरोजपणे चालू असतात त्यामुळे हा एक प्रकार सकारात्मक गोष्ट आहे असा लोकांनचा समज होत आहे.

4) शेवटी हे सर्व मौजमजा साठीच असते त्यामुळे एन्जॉयमेन्ट तर होतच असते.आणि तसेही चोरून खाल्लेली पेरू खूप गोड लागतात तशी अवस्था झाली आपली.

5) लग्नाची जोडी बरोबर न जुळणे हे पण एक पारंपरिक आणि तितकेच महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते.बरेच पती-पत्नी हे Arrange Marraige करतात आणि सर्वांनाच माहीत आहे की भारतीय लग्न ही कशी जुळविली जातात.

6) आपण निरर्थक गोष्टींचा अति जास्त विचार लग्न जुळवताना करत असतो जसे की धर्म/जात/पोटजात/प्रांत/भाषा/मामकुळ/बापकुळ त्यामुळे या असलंया फालतूपणा मुळे कोणालाच मना सारख्या जोळीदार मिळणे जवळपास अशक्यच असते असे म्हटलं तर वावगे होणार नाही. त्यामुळे हे पण एक कारण अशु शकते.

7) आजकाल लग्न खूप उशिरा होत आहेत हे पण एक कारण असू शकते.पाश्चिमात्य संकल्पना/संस्कृती हळूहळू भारतात हात-पाय पसरवीत आहे हे पण एक कारण आहे। जसे की पुण्यात बाहेरून शिक्षणनासाठी आणि नौकरी साठी आलेले बरेच मुलं-मुली हे एकत्र राहताना दिसतात अगदी नवरा-बायको सारखे.

Team Marathi Tarka