Marathitarka.com

बाथरूममध्ये सोबत आंघोळीला गेलेल्या नवरा-बायकोसोबत झाले असे कांड,ऐकून व्हाल थक्क…

बाथरूममध्ये सोबत आंघोळीला गेलेल्या नवरा-बायकोसोबत झाले असे कांड,ऐकून व्हाल थक्क…

काही दिवसापूर्वी पंजाबमध्ये बाथरूममध्ये गॅस लिक झाल्याने एका दांपत्याचा मृ-त्-यू झाल्याची बातमी समोर आली होती. हे दाम्पत्य आपल्या बाथरूममध्ये दोघेही एकत्र आंघोळ करत होते. त्यावेळेस ही घटना घडली होती.मात्र, आता मुंबईच्या घाटकोपर भागातून देखील अशीच एक घटना उघडकीस आली असून या प्रकरणाची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये एक कुकरेजा टाॅवर येथे ही घटना घडली. कुकरेजा टाॅवर येथे मीनल आणि रोहित हे दाम्पत्य राहत होते. दोघांचेही नव्यानेच लग्न झाले होते. दोघांनी कुकरेजा टॉवर येथे भाड्याने फ्लॅट घेतला होता. दोघेही सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय मोजमाजा करणारे होते, असे त्यांना पाहणारी लोक सांगतात.

आता काही दिवसांपूर्वी धुळवड मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. दोघेही रंगाने माखलेले होते. त्यामुळे दोघेही बाथरूममध्ये एकत्रितरित्या आंघोळ करत होते. आंघोळ करता करता बाथरूम मधील गॅस लीक झाला आणि त्यानंतर मग या दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दांपत्याच्या घरी कामाला येणारी बाई ज्यावेळेस सकाळी घरी आली त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला.

ही बाई दरवाजाची बेल वाजवत होती. मात्र, दरवाजा कोणीही उघडत नव्हते. त्यामुळे तिला संशय आला तिने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घरी आले, त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता बाथरूमचा दरवाजामधून बंद होता. मग त्यांनी बाथरूमचा दरवाजा देखील तोडला. त्यावेळेस दोघांचेही नग्न अवस्थेतील मृतदेह सापडले. दोघेही आंघोळ करताना मृत्यूमुखी पडले. गॅस लिक झाल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.

Team Marathi Tarka